This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

निवासी वापरासाठी भूखंडाचा ओएनजीसीकडून गैरवापर

 सिडकोची कारणे दाखवा नोटीस, हिवाळी अधिवेशनात मुद्दा गाजणार
सिडकोने 30 वर्षांपूर्वी कवडीमोल भावात 47 हेक्टर जमिनी ओएनजीसीला कर्मचारी निवासस्थानासाठी दिली.
ओएनजीसीने या भूखंडावर कर्मचारी निवास निर्माण न करता त्या भूखंडावर सिडको व पोलिसांच्या परवानगीविना स्फोटके साठवली आहेत. गेली 30 वर्षे या भूखंडाचा विकास न करता त्या जागेचा गैरवापर केल्याने सिडकोने ओएनजीसीकडून भूखंड काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी मुंबई । प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील काळुंद्रे परिसरात ओएनजीसीला निवासी वापरासाठी सिडकोने कवडीमोल भावात दिलेल्या सुमारे 47 हेक्टर भूखंडाचा गत 30 वर्षात विकास न करता ओएनजीसीने या जागेवर सिडकोच्या परवानगी विना स्फोटके साठवून जागेचा दुरुपयोग केल्याचे उघडकीस आले आहे.  सिडकोने ओएनजीसीला कारणे दाखवा नोटीस बजावून ओएनजीसीसोबत करारनामा रद्द करून भूखंड ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
निवासी वापरासाठी गरज नसतानाही सुमारे अडीच हजार कोटींची 47 हेक्टर जागा हडप करण्याच्या उद्देशाने ओएनजीसी प्रशासनाने सिडकोच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत आमदार अनिल बाबर व सुनील राऊत यांनी येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल मागितला आहे. 
ओएनजीसी कर्मचार्‍यांसाठी सिडकोने 30-35 वर्षांपूर्वी सीबीडी येथे दिलेली जागा गेल्या कित्येक वर्षांपासून रिकामीच आहे. फेज-1 मध्ये सिडकोने दिलेली 28 हेक्टर जागा ओएनजीसीने हौसिंग कॉलनीसाठी विकसित केली. त्यानंतर ओएनजीसीला फेज-2 मध्ये निवासी वापरासाठी दिलेल्या 32.47 हेक्टर जागेपैकी फक्त 50 टक्के जागा ओएनजीसीने विकसित केली आहे. 50 टक्के जागेचा वापर होणे अद्याप बाकी आहे. असे असताना 1985 साली फेज-3 मध्ये सिडकोने ओएनजीसीला पनवेल इथल्या काळुंद्रे परिसरात 47.41 हेक्टर जागा निवासी वापरासाठी दिली आहे. परंतु गत 30-32 वर्षांत या जागेवर ओएनजीसीने साधी एक वीटही रचलेली नाही. 
सिडकोने 2011-12 पासून ओएनजीसीला जागा उपयोगात आणण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस (शोकॉज) बजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर ओएनजीसीने सिडकोला पत्र लिहून काळुंद्रेतील जागेवर हॉस्पिटल्स किंवा स्पोर्टस् कॉम्फ्लॅक्स उभारण्याची परवानगी सिडकोकडे मागितली. मात्र ओएनजीसीला दिलेल्या जागेचा वापर हा फक्त निवासी वापरासाठी असल्याने 2015 मध्ये सिडकोच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालकांनी जागा ताब्यात घेण्याचा इशारा देऊनही आजतागायत ओएनजीसीने या जागेवर हौसिंग स्कीम उभारण्यासंदर्भात काहीच हालचाल केलेली नाही.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support