Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

उकाडा सोसवेना

नोव्हेंबर सुरु झालाय तरीही मुंबईकर सध्या ऑक्टोबर हीटचा अनुभव घेत आहेत. तापमानातील बदल आणि शहरातील हवेचा वाईट दर्जा यांचा विचार करून संसर्गाचा वाढीव धोका, स्टॅमिना कमी होणे आणि इतर अनेक समस्या भेडसावू शकतात. 
उन्हाळ्यापासून सर्वोत्तम बचाव करण्यासाठी आपण या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 
1) हायड्रेशन ः दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचे महत्त्व खूप आहे आणि या उन्हाळ्यात तर त्याची जास्त गरज असते. पुरेसे हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. इन्सुलेटेड पाण्याच्या बाटल्या घेतल्याने पाणी दिवसभर थंड राहते. तुम्ही तुमच्या पाण्यात ताजी फळे घालू शकता. त्यामुळे तुम्ही जास्त पाणी पिऊ शकाल. पुदीना, लिंबू आणि ऋतूतील मोसमी फळे वापरू शकता.
2) तुमच्या शरीराच्या थंडाव्याच्या जागा शोधा ः धुतलेले कपडे घ्या आणि ते पाण्यात भिजवा. जास्तीचे पाणी काढून टाका, त्यांना घट्ट पिळून फ्रीजरमध्ये ठेवा. टॉवेल कडक होईपर्यंत बर्फात राहू द्या. तुम्ही पाण्याच्या मिश्रणात जास्त तजेला आणण्यासाठी एसेंशियल तेले घालू शकता. हे टॉवेल थंड करणार्‍या ठिकाणी लावा, तुमची मनगटे, मानेच्या मागे, पाय आणि कपाळ. 
3) घाम स्वतःपासून दूर ठेवा ः आपल्यापैकी अनेकांसाठी घाम आणणारी आर्द्रता हा ऑक्टोबर हीटचा सर्वांत वाईट भाग आहे. तुम्हाला खूप घाम येत नसला तरी, तुम्ही काही युक्त्या वापरून उष्णता दूर ठेवू शकता. जसे, रात्रीच्या वेळी अँटी पर्स्पेरंट वापरणे जे परिणामकारक ठरते. अँटी पर्स्पेरंटचा वापर सावधगिरीने करावा, विशेषतः वृद्धांमध्ये.
4) थंड होण्यासाठी पोहायला जा ः तुमच्या जवळच्या व्यायामशाळेत किंवा सार्वजनिक स्विमिंग पूलवर पोहायला जा. दिवस खूप गरम असतात तेव्हा थंड पाण्यात पोहणे आणि शॉवरशिवाय जास्त चांगले काहीही नसते. शक्यतो दिवसातून दोन वेळा जा, नाहीतर दिवसातून एकदा गेलेच पाहिजे.
5) थंड पदार्थ खा, थंड राहा ः तुमच्या अंतर्गत यंत्रणा थंड करणार्‍या खाद्यपदार्थांचे सेवन करा. घरगुती फ्रोजन ज्यूस उत्तम आहेत. गोड आणि पिकलेली फळे, ताज्या भाज्या आणि कडू किंवा तुरट असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करा. कलिंगड किंवा मोसंबीसारखी फळे या भाजणार्‍या हवामानात सर्वोत्तम आहेत आणि सफरचंदे थंडाव्यासाठी चांगली असतात.
6) श्वसनाचे व्यायाम आणि मेडिटेशन ः प्राणायाम आणि मेडिटेशन करा. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होईलच, पण त्याचबरोबर काळजी आणि मूड स्विंग्सही कमी होतील. तुमचे मन शांत करण्यासाठी मेडिटेशन करा आणि श्वसनाचे व्यायाम त्याला उपयुक्त ठरतील. 
7) हलके आणि हवेशीर कपडे घाला ः कॉटन आणि लिनेनसारखे हलके कपडे घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सैलसर असावेत आणि तुमच्या त्वचेला श्वसन करता यावे. गडद रंगांऐवजी पिवळ्या आणि पांढर्‍या रंगासारख्या हलक्या पेस्टल शेड घालाव्यात, जेणेकरून उष्णता परावर्तित होईल. 
8) सूर्यापासून संरक्षण ः आपल्या त्वचेचे सूर्याच्या घातक यूव्ही किरणांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किमान 50 एसपीएफ असलेल्या सनस्क्रीनचा वापर करा. ही क्रीम बाहेर पडण्यापूर्वी 1.5-2 तास लावण्यात यावी आणि त्यानंतर 2 तासांनी पुन्हा लावण्यात यावी. बाहेर जाताना थेट सूर्यकिरण टाळण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करा. दुपारी 12 ते 4 मध्ये बाहेर पडणे टाळा.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support