Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

राजकीय आतषबाजी!

लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष व त्यांच्या कर्ता, करवित्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने यंदाचा दिवाळी फराळाची सामान्य माणसासाठी गोड असला तरी सत्तेची धुंदी चढलेल्यांना आणि सत्तेपासून दुरावल्याने रस्त्यावर आलेल्यांना फारशी गोडी राहिलेली नाही. सत्ताधुंदांना धडा शिकवा (शिवसेना सेनापतींचा भाजपविरोध), आमच्या खिशातले राजीनामे खिशातच (शिवसेनेचा स्वाभिमानी बाणा), सपनौं का सौदागर (काँग्रेसचे मोदींविरोधात सुरसुरे) मोदी म्हणजे अ‍ॅनाकोंडा (आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांचे फटाके), दिवाळीत रामाच्या नावाने दिवे लावा (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ), लोकसभेपूर्वी मेगाभरती..दोन लाख नोकर्‍या (मोदी सरकारला झाली अच्छे दिनची आठवण), याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना (फडणवीसांचे शिवसेनेला बोल), उमेदवारावर कितीही गुन्हे असो उमेदवार जिंकायला हवा (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हीडिओ व्हायरल). खरतरं राजकारण्यांच्या तोंडून दिवाळी असो वा दसरा प्रत्येक क्षणाला निघणारी ही सुभाषिते सणवारांपेक्षा राजकारणाची महती अधिक वर्णतो.‘सत्ते पे सत्ता’साठी आपले अच्छे दिनफेम मोदी सरकार यापुढे काय काय करतील, याचा नेम नाही. देशाचे पोलादीपुरूष दिवंगत वल्लभभाई पटेल यांचा अहमदाबादेत सरदार सरोवराच्या तीरावर पुतळा उभारून मतांच्या बेगमीसाठी गुजरातमध्ये ‘पटेल’ अशी खेळी खेळून मोदी कधीच मोकळे झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलच्या जागेवर भिमस्मारक उभारल्याबगर आता मी, दम घेणार नाही, असा दृढनिश्चय कधीच सोडला आहे. तो निवडणुका संपल्यावर पूर्ण होईल? हे महाराष्ट्रातील जनतेलाही चांगलेच ठावुक आहे. यामागील फडणवीस यांची भावनाही कधीच दडून राहिलेली नाही. ऐन दिवाळीत फडणवीसांना शिवसेनेचे नको नको अशी दूरदूर राहू, हे अधिक अस्वस्थ करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून शिवसेनेचे आमदार, खासदार व मंत्र्यांनी केव्हापासून आपल्या खिशात राजीनामे ठेवले आहेत. याची भीती वारंवार मुख्यमंत्र्यांना सतावत असल्याने एकदाच एक घाव दोन तुकडे होऊ  दे असे म्हणत त्यांनी भाजपाकडून शिवसेनेला ललकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांनी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांचे खासदार पाठवू; अन्यथा आम्ही आमचे खासदार निवडून आणू, असा निर्वाणीचा इशारा फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला दिला आहे. कोणी काहीही उलसुलट छापले किंवा लिहिले तरी राज्यात आजही भाजपाचा नंबर वनचा पक्ष आहे, हे बेंबीच्या देठापासून कोकलून त्यांना सांगावे लागले आहे. शिवसेनेच्या बेदिलीला कंटाळून‘याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना’ ही कडू भाषा ऐन दिवाळीत मुख्यमंत्री साहेबांना वापरावी लागली आहे. दिवाळीनंतर राजकीय फटाके आणखी जोरात फुटतील हे नक्की. परंतु मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरचे बिनआवाजी फटाके आधीपासूनच वाजवायला सुरुवात केली आहे. अहो..राममंदिर उभारणीचेच घ्या ना. मोदींना भाजपाला आणि संघ परिवाराला जे साडेचार वर्षांत जमलं नाही ते करण्यासाठी शिवसेनेचे वाघ पक्षप्रमुखांसह 25 नोव्हेंबरला थेट अयोध्येवर धडकणार आहेत. थेट राम मंदिर बांधकामाची वीट रचण्यासाठीच? राम मंदिराचं राजकारण अगदी चार वर्षे सत्तेची हवा केल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर आलं आहे. राम मंदिराचा मुद्दा म्हणजे अगदी तोफेचा गोळा. या तव्यावर अगदी 92-93पासून भाकरी शेकविण्यासाठी अविरत स्पर्धा सुरू असल्याने महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आदी प्रश्न आपले राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींसाठी गौणच. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं जागावाटपात अद्याप मनोमिलन होत नसल्याने पवारसाहेबांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कुणाला कळल्यास वाव नाही. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील हे जोडीने प्रसंगी गुलाम नबी आझाद, मल्ल्किार्जुुन खर्गे अशा केंद्रातील नेत्यांना सोबत घेऊ न जनसंघर्ष करत आहेत. मात्र त्यांच्या या संघर्षाला समविचारी मित्रांच्या आघाडीची साथ अजूनही लाभत नसल्याने काँग्रेसची असून अडचण आणि नसून खोळंबा अशी गत झाली आहे. रिपाइं (ए) गटाचा रामदास आठवले यांचा तंबू पूर्णपणे भाजपाकडे झुकला आहे. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांची सत्ता येते, असा दावा आठवले करत आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेच्या दक्षिण मध्य-मुंबई मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकला आहे. यासाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना भाजपाचा मतदारसंघ असलेल्या पालघर जिल्ह्यात पाठवा, अशी एकमुखी मागणीही त्यांनी केली आहे. रिपाइंच्या विविध गटांची युती झाली नाही तरी चालेल पण, शिवसेना-भाजप युती झाली पाहिजे, यासाठी रामदास आठवले आग्रह धरून आहेत. इकडे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी व एमआयएमसोबत युतीने काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचीही अडचण केली आहे. सहन होत नाही नि सांगता येत नाही, असे एकंदर युती, आघाडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत फुलबाजे, सुरसुरे, पाऊ स, लक्ष्मीबॉम्ब अशी राजकीय आतषबाजी झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support