Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

कायदा धाब्यावर बसवून उल्हासनगरातील शिक्षण मंडळ जोमात

शासनाच्या आदेशाला सत्ताधार्‍यांनीच फासला हरताळ 

  उल्हासनगर । प्रतिनिधी
उल्हासनगर महापालिकेच्या कामचोर शिक्षण मंडळाने पुन्हा एकदा शासनाच्या नियोजन विभागाच्या अध्यादेशाला धाब्यावर बसवत ठेकेदारामार्फत शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी केली जाणार आहे. या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. डिसेंबर 2016 मध्ये विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरूपात दिले जाणारे लाभ बंद करून विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा शासनाने अध्यादेश काढला होता. 
डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने एक शासन निर्णय काढला. या शासन निर्णयात शासनाचे विविध विभाग, स्वायत्त संस्था आदींनी कोणत्याही वस्तूंची खरेदी न करता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासंबंधी हा आदेश होता. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना उत्तम दर्जाची वस्तू रास्त दरात घेता येणार होती. यामुळे 2017-18 ह्या वर्षासाठी लाभार्थ्यांची आधार कार्डशी संलग्न अशी बँक खाती तात्काळ काढण्याचे आदेश सर्व सरकारी आणि निम्म सरकारी विभागांना देण्यात आले होते. 
मात्र भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळाने डिसेंबर महिन्यानंतर चार महिन्यात बँकेत विद्यार्थ्यांची खाती न उघडल्याने 2017 मध्ये ठेकेदारामार्फत वस्तू खरेदी करण्यात आली. त्यानंतर शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची खाती बँकेत उघडणे गरजेचे होते, मात्र तसे झाल्यास शिक्षण मंडळातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना ठेकेदाराकडून मिळणार्‍या मलिद्यावर पाणी सोडावे लागणार होते. ही बाब लक्षात घेऊन 2018 मध्येही विद्यार्थ्यांची बँकेत खाती खोलण्यात आली नाहीत. 
असे असले तरी शिक्षण मंडळात निम्म दर्जाचे शिक्षण घेणार्‍या गोर गरिबांच्या मुलांचे आम्हीच वाली हे दाखविण्यासाठी सत्ताधार्‍यांनी शैक्षणिक साहित्य ठेकेदारामार्फत पुरविण्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर घेतला. हा प्रस्ताव नियोजन विभागाच्या आदेशाला हरताळ फासणारा असल्याने तो प्रशासनाने बाद ठरविणे आवश्यक असताना प्रशासनाकडून या प्रस्तावाची पाठराखण करण्यात आली. यामुळे प्रस्ताव महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी बहुमताने पारित केला आहे. मात्र हा प्रस्ताव बेकायदा असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मनोज शेलार यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिले आहे.
 विद्यार्थी संख्येवरून वाद !
उल्हासनगर  महापालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये 5200 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती पालिकेद्वारे बनविण्यात आलेल्या प्रस्तावात नमूद केली आहे. प्रत्यक्षात किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, याबाबत शिक्षण समिती सभापती रवी जग्यासी यांनीच प्रशासनासह मुख्यध्यापकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support