Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

ठाणे पालिकेतील डिजिटल कार्यप्रणालीला ब्रेक

 ऑटोमेशन यंत्रणेचा ठेका रद्द

ठाणे। प्रतिनिधी
ऑटोमेशन यंत्रणेमुळे कर्मचार्‍यांचा पगार उशीराने होत होता. त्यामुळे त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडत होते. याविषयी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर ऑटोमेशनचे काम ज्या ठेकेदाराला दिले होते त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला आहे. शिवाय 1 कोटी 20 लाखांची बँक गॅरेन्टीसुद्धा पालिकेने जप्त केली आहे. 
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळास वेगवेगळ्या विभागांचे एकत्रिकरण करून कामकाजात सुसुत्रता आणतानाच महापालिकेचा कारभार कागदमुक्त करण्यासाठी ईआरपी (इंटरप्रायजेस र्सोस प्लॅनिंग) ही हायटेक संगणक प्रणाली सुरू करण्यात आली. 2014 मध्ये या संदर्भातील प्रस्ताव तयार करून तो महासभेत देखील मंजुर करण्यात आला होता. यासाठी 12 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेतील 28 विभागांचे एकत्रिकरण करून त्या माध्यमातून आयटी क्षेत्रात ज्या पद्धतीने काम केले जाते. त्यानुसार महापालिकेचे कामकाजही केले जाणार होते. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये संबंधित ठेकेदाराकडून कामाचा कार्यादेश देण्यात आला होता.
या कार्यादेशानंतर सर्व विभागांची माहिती गोळा करून पुढील दहा महिन्यात ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र या कालावधीनंतरही ही प्रणाली सुरू होऊ शकलेली नव्हती. यासंदर्भात पालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर संबंधित ठेकेदाराने ही प्रणाली कार्यिन्वत केली. एकूणच अतिशय हायटेक संकल्पना असल्याने सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात संबंधित ठेकेदाराच्या सब ठेकेदाराकडून 28 पैकी 4 ते 5 विभागांचेच एकत्रितकरण केले. परंतु त्यातही अनेक त्रुटी दिसून आल्या. अखेर पालिकेच्या संबंधित विभागाने या संदर्भात कठोर पावले उचलत त्या संस्थेचा ठेका तर रद्द केला आहेच, शिवाय त्याची 1 कोटी 20 लाखांची बँक गॅरेन्टी सुध्दा जप्त केली आहे. 
ऑटोमेशन प्रणालीद्वारे गोळा होणार्‍या माहितीच्या आधारे कर्मचार्‍यांचे पगार काढले जात होते. पंरतु या प्रणालीतील त्रुटीमुळे गेल्या वर्षभरापासून कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नसल्याचे वृत्त ऑगस्ट महिन्यात प्रसिध्द झाले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले होते. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support