Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

खरेदीसाठी उतरलेल्या ठाणेकरांनी रस्ते तुडुंब । जिकडेतिकडे प्रचंड वाहतूक कोंडी

दिवाळीचा उत्साह शिगेला!

वाहनतळ नसल्याचे वाहतूक कोंडीत भर
खरेदीसाठी झुंबड उडाल्यामुळे ठाण्यात वाहतुकीची बोंब झाली होती. अनेक ठिकाणी सिग्नल बंद करून वाहतूक नियमन पोलिसांनी सुरू केल्यावर या कोंडीत भर पडली. बाजार परिसरात कुठेही वाहनतळ नसल्याने वाहने, दुचाक्यांनी वाट अडवून गर्दीत भर घातली होती. वाट्टेल तशा गाड्या उभ्या करून खरेदीसाठी दुकानांत शिरणार्‍या नागरिकांचा त्रास सोसावा लागला. गोखले रोड,राम मारुती रोड,मुख्य बाजारपेठ,मासुंदा तलाव,घंटाळी रोड,तीन पेट्रोल पंप,अल्मेडा रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होती.
ठाणे । प्रतिनिधी
दीपावली म्हणजे नावीन्य, प्रकाश, उत्साह. सणांचा राजा असलेल्या दिवाळीनिमित्त यंदा सप्ताहाखेर ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उतरलेल्या ठाणेकरांनी रस्ते फुलून गेले होते. फेरीवाले, वाहने, छोटा-मोठा माल आणणारे टेम्पोसारखी वाहने आणि त्यातून वाट काढणारे ठाणेकर यामुळे जिकडेतिकडे शनिवार, रविवार प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. जुनी बाजारपेठ, तलावपाळी, गोखले रोड, राम मारुती रोडवर वाहतूक चाळीस मिनिटे तरी हलत नाही असा अनुभव या दोन दिवसांत अनेकदा ठाणेकरांनी घेतला.
हेच चित्र कल्याण, डोंबिवलीपासून अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर सर्वच कुटुंबांनी खरेदीसाठी दुकानांकडे धाव घेतली आहे. रविवारी तर खरेदीच्या या उत्साहाने कळस गाठला आणि ठाण्यात प्रमुख रस्त्यांवर आणि रेल्वे स्थानक परिसरात दिवसभर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.
कपड्यांपासून ते दागदागिने खरेदीसाठी ठाणे ग्रामीण परिसरातूनही आणि सभोवतालच्या शहरांमधून नागरिक ठाण्यात येत असतात. यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडली होती. रविवारी सर्वच बाजारपेठांत मोठी उलाढाल झाली.

दिवाळीचे पोशाख, गृहसजावटीच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पादत्राणे, रांगोळी, पणत्या एक ना अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. दिवाळीचे स्वागत तेजोमयी ज्योतींनी करणार्‍या पणत्यांचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये साध्या लाल मातीच्या पणत्यांपासून आकर्षक रंग सजावट, कुंदन वर्क, नक्षीकाम केलेल्या पणत्या उपलब्ध आहेत. 

राम मारुती रोडवर लखलख
दिवाळी खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांच्या स्वागतासाठी राम मारुती रोड व्यापारी मंडळाने संपूर्ण रोडवर आकर्षक रोषणाई करून ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. आकाशकंदिल, प्रकाशमाळा, झाडांभोवतीच्या प्रकाशनलिकांनी संपूर्ण रोड लखलखतो आहे. आय लव्ह ठाणेचा विशेष सेल्फी पॉईंट प्रत्येकाची नजर खिळवून ठेवतो आहे. येथे फोटो काढण्यासाठी संध्याकाळपासून एकच गर्दी उसळली होती.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support