Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

ग्रामपंचायत सदस्यांकडून ग्रामविकास अधिकार्‍याच्या चौकशीची मागणी

  

भिवंडी । प्रतिनिधी
तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून ठरावावर चर्चा करणार्‍या जिल्हा परिष  सदस्य व त्याला पाठबळ देणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी मागणी ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी ठाणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिष सदस्य गोकूळ कचेर नाईक यांनी ग्रामपंचायतीच्या 11 ऑक्टोबरच्या मासिक सभेत अवैधपणे प्रवेश करून ठरावावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपसरपंच प्रियंका अनिल पाटील, सदस्य योगेश पाटील, सुषमा पाटील, पूनम पाटील, राधा चौधरी, जमूना नाईक, रामचंद्र पाटील, हनुमान चौधरी, अनिल नाईक, विलास जोशी आदी दहा सदस्यांनी गोकूळ नाईक यांच्या बोलण्याला विरोध करून तुमचे काही म्हणणे असेल तर ते सांगा आणि तुम्हीं सभेमधून बाहेर निघून जा, असे सांगितले. त्यावर नाईक यांनी ग्रामपंचायत सदस्यांना उलटसुलट बोलून मला मासिक सभेमध्ये बसण्याचा व ठरावावर चर्चा करण्याचा अधिकार आहे, असे सुनावले. यावर ग्रामविकास अधिकारी हिरामण तरवारे यांच्याकडे विचारणा करून लेखी उत्तर मागितले असता त्यांनी जि.प. सदस्यास पाठीशी घालण्याचे काम केले. 
मासिक सभेच्या अजेंड्याप्रमाणे सदस्यांनी कामकाजाची मागणी लावून धरली असता त्यास जि.प. सदस्य गोकूळ नाईक यांनी हस्तक्षेप करून मर्जीपणाने ठराव केले, असा आरोप सदस्यांनी निवेदनात केला आहे. या कृतीचा निषेध म्हणून दहा सदस्यांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला असता जि.प. सदस्य गोकूळ नाईक यांनी ठराव करण्यासाठी सात सदस्य आहेत. आम्हांला दहा सदस्यांची गरज नाही, असे बोलून सदस्यांना अपमानीत केले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support