This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

सावध ऐका ‘जाती’च्या हाका!


तुम्ही जात सोडा आम्ही आरक्षण सोडतो! हे लोक किती वर्ष आरक्षण मागणार? तोंडावर गोड आणि पाठ वळताच जातीची मळमळ बाहेर काढणारे‘जातीवंत’, कर्मठ कावळे लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काव-काव करू लागले आहेत. हे कावळे आता सोशल मिडियावर, माध्यमांसमोर बेताल बडबड करून समाजासमाजांत भांडणे नि प्रसंगी दंगली पेटविण्यासाठीही प्रोत्साहित करतील. आग लावून झाल्यावर कोण जळतो आहे, कोण मरतो आहे, हे गमंतीने बघण्याचा त्यांचा व्यापक कार्यक्रमही सुरू होईल. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच जातीची संहिता लागू होण्यास आता सुरुवातही झाली आहे. हा दर पाच वर्षांनी तुम्हा-आम्हाला जातीच्या नावाखाली लढवणारा सार्वत्रिक कार्यक्रम.इथे सर्व समाज, जाती-पंथ, धर्म आपसांत गुण्यागोविंदाने नांदत असले तरी निवडणुकीपुरतं आपणं एकमेकांची जातीनिहाय चौकशी आता करणार आहोत. प्रसंगी जातीसाठी एकमेकांच्या जिवावरही उठणार आहोत. अहो पुण्यात आयोजित एका ब्राम्हण संमेलनाचचं घ्या!..तिथे भाजप आमदार मेधा कुलकर्णी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू तथा विधान परिषदेच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी जातीचे निवडणूक फुत्कार सोडून कधीच आघाडी घेतली आहे. आता देशाचं नेतृत्व ब्राम्हणच करेल! याआधीही ब्राम्हणांनी देशाचं नेतृत्व केलं आहे व पुढेही तोच करेल, असा जातीचा राग आमदार मेधा कुलकर्णी यांनी अगदी बेंबीच्या देठापासून आळवला आहे. तोच सूर आळवत शोभाताई फडणवीस यांनीही ‘ब्राम्हण समाजाने देशाचं नेतृत्व करावं, अशी मागणी समाजातूनच पुढे येईल’, असे भविष्य कथनही केलं आहे. आपल्या समाजात जनजागृती निर्माण करणे हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य, अधिकार आहे शोभाताई व मेधा कुलकर्णी यांनीही तेचं केलं. पण, हा जनजागृतीचा विस्तव पेटविण्यासाठी त्यांनी नेमका निवडणुकीच्या तोंडावरचा मुहूर्त का साधावा? वाणी समाजातील ओबीसी प्रर्वगात मोडणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेखी चुकली का? भाजप ब्राम्हण समाजातील पंतप्रधान पुढे आणत आहे का? महाराष्ट्रातील कष्टकरी, शोषित, वंचित, आदिवासी, शेतकरी, श्रमिक यांची खडान्खडा माहिती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही ब्राम्हण हा चष्मा लावूनच महाराष्ट्रातील इतर समाजाने आता बघायचं का? मुख्यमंत्री ब्राम्हण असल्याने ते इथल्या बळीराजाच्या प्रश्नांकडे फारसं लक्ष देत नाही, हा जातीनिहाय सूर खरा मानावा का? मुख्यमंत्रीपदी ब्राम्हण माणूस बसल्याने त्यांना हटविण्यासाठी मोर्चे, आंदोलने, हिंसाचार, दंगली वाढल्या आहेत, हा जावईशोध खरा मानावा का? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी सर्व काही संपवण्याच्या बाता ठोकणार्‍या सरकारची घागर चार वर्षांच्या कार्यकाळात उताणी पडली म्हणून सरकारचा ‘जात’शोध घ्यायचा का? खरतरं सुधारणावादी ब्राम्हण समाजाचं नेतृत्व महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येकाने उचलून धरलं आहे. त्यांच्याकडे जातीने नव्हे तर माणूस ही जात पाहून त्यांचं आभाळाएवढं कर्तृत्व आणि काम पाहून. 
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांना एका विशिष्ट जातीचा चष्मा लावून कुणी पाहिलं? खरतरं विनाशकारी बालिशबुद्घीवर इतकी चर्चा करण्याचं कारण नक्कीचं नाही. पण, आपल्याकडे निवडणुकांसोबत जातही येते. एका जबाबदारीच्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या जातीचा अभिमान बाळगावा की देशाचा, समाजाचा? हा पहिल्याच्या वर्गात वर्षांनुवर्षे नापास होणार्‍यांना आणखी किती वर्षे तोच तो प्रश्न विचारणार? खरतरं धर्मनिरपेक्ष, समरसतावादी, सर्व जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेणारे आम्हीच. आमच्या पक्षाच्या तत्वात जात ही गोष्ट बसतं नाही, असे खुलासे अनेक पक्ष ठामपणे करताच. पण, जातीजातींत लावून देणे, जात पाहून मत देणे हा निवडणूक कार्यक्रम आपल्याकडे नाही, हे कोणत्या मायचा लाल छातीठोक सांगेल? मुख्यमंत्र्यांच्या काकूचं फारसं कुणी मनाला लावून घेणारं नसलं तरी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी कमालीची मळमळ बाहेर काढून ब्राम्हण संमेलनाच्या कार्यक्रमात टाळ्या मिळवल्या आहेत. ‘जोपर्यंत मी स्वत:ला महात्मा गांधींचा भक्त नाही, असे ठामपणे म्हणणार नाही तोपर्यंत हे असचं चालत राहणार. आपल्या डाव्या गालावर कुणी मारलं तर त्याच्या उजव्या गालावर मारण्याची क्षमता माझ्याकडेही असायला हवी. आपल्याला उत्तराला प्रतिउत्तर करता आलं पाहिजे, हे धगधगते निखारे शोभाताईंनी उपस्थित समुदायासमोर पेटवले. शोभाताईंच्या या क्रांतिकारी भाषणाने त्यांचा निवडणूक हेतूही कदाचित सफल झाला असेल. पण, हा जनजागर स्वत:ला क्रांतिकारक म्हणवून घेणार्‍या समाजाच्या प्रत्येक स्तरातील नेत्याने निवडणुकीआधी केल्यास मेधा कुलकर्णी आणि शोभाताई फडणवीस यांच्या वक्तव्यांचा असा जातीनिहाय ‘अर्थ’ लावता येणार नाही. वय झाल्यावर माणसाच्या विचारांत बदल होतो, असे म्हणतात. पण, साठी झाल्यावरचं अनेकांसाठी बुद्धी नाठी व्हायला सुरुवात होते. शेकापचे माजी ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे याचंही हे असचं झालं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार नव्हेत, हा जावईशोध लावून त्यांनी समस्त समाजाचा रोष ओढवून घेतला. आपण का बोललो, काय बोललो आणि जाणीवपूर्वक बोललो याचा अर्थ ज्यांनी त्यांनी धोंडगेंच्या वक्तव्यानंतर लावला. धोंडगेंसारखी असंख्य मंडळी आता निवडणुकीची वर्दी मिळाल्यानंतर बिळाबाहेर पडणार आहेत. त्यामुळे कोण काय बोलले, पुतळ्याचं राजकारण काय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाखाली खेळले जाणारे जातीनिहाय राजकारण आणि गनिमी काव्याला आपण प्रथम भारतीय व अंतिम भारतीय म्हणून बळी पडणार की नाही, हे ज्यांनी त्यांनी ठरवावं.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support