Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

खा. संभाजीराजे यांनी केली रायगड प्राधिकरणाअंतर्गत कामांची पाहणी



महाड । निलेश पवार
किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सद्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे काम केले जात असल्याचे सांगितले. 
किल्ले रायगड गेली अनेक वर्ष विकासापासून आणि संवर्धनापासून दुर्लक्षित राहीला. यामुळे गडावरील वास्तूंचे नुकसान झाले, शिवाय शिवप्रेमींना हव्या असलेल्या सोयीसुविधांचा अभाव निर्माण झाला. याबाबत वारंवार आवाज उठल्यानंतर शासनाने रायगडसह राज्यातील विविध किल्ल्यांच्या संवर्धनाकरीता एक प्राधिकरण तयार केले. 
या रायगड प्राधिकरण विभागाकडून सद्या रायगडाच्या विविध घटकांचा अभ्यास करून संवर्धन आणि पर्यटक, शिवप्रेमींना गरजेच्या सोयीसुविधांचे काम केले जाणार आहे. यामध्ये रायगडावरील ऐतिहासीक वास्तू, पायायांचा मार्ग, प्रकाश योजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. याकरीता 600 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
यापैकी 59 कोटी रूपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. यामधून रायगडच्या विविध पाण्याचे स्त्रोत दुरूस्त करणे, ऐतिहासिक वास्तूंची कामे, पायरी मार्ग, महाड रायगड मार्ग यांची कामे केली जात आहेत. रायगडावरील जवळपास 21 टाक्यांचा गाळ काढण्याचे काम यामधून करण्यात आले आहे. तर हत्ती तलावाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या कामांची पाहणी शनिवारी खा. संभाजीराजे यांनी केली. 
रायगडावर जाण्यासाठी असलेल्या पायी मार्गाचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांकरीता नाना दरवाजाचा मार्ग सुरू करण्यात आला आहे. यामार्गात असलेल्या नाना दरवाजाचे काम कशा प्रकारे केले जाणार याची माहिती देखील यावेळी खा. संभाजीराजे यांनी दिली. त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, रायगड प्राधिकरणाचे विश्वनाथ सातपुते, आरेखक वरून भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वप्नील बुर्ले आदी उपस्थित होते. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support