This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

आदिवासी बांधवांसाठी दिवाळी भेट

ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानतर्फे साहित्य वाटप
 ठाणे । प्रतिनिधी

ग्रामीण भागातील लोकांनाही उत्साहात दिवाळी साजरी करता यावी याकरता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठनने मदत केली आहे. ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील पिंजाळ पाडा आणि ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळील जुनावना पाडा येथील आदिवासी कुटुंबातील नागरिकांना दिपावलीनिमित्त कपडे, धान्य, वस्तू वाटप करण्यात आले.
दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात नागरिकांनी गरीब कुटुंबाकरीता कपडे, डाळ, साखर, घरगुती भांडी यांची मोठ्या प्रमाणात मदत केली. यामध्ये संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी देखील सर्वांनी मिळून खारीचा वाटा उचलत डाळ आणि साखर जमा केली. या उपक्रमाकरिता अरविंद उतेकर, अनघा सुर्वे, तेजस वर्खाडे, मनोहर चव्हाण, अमोल पांडे यांनी कपडे आणि वस्तूंची मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, उपाध्यक्ष अमित मोकाशी, खजिनदार सुरज कदम, सदस्य रोहित शिगवण, नरेश देशमुख, स्वप्नील भोईर, संतोष पांडे, अमित सावंत, विकास जाधव, केतन देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त पहिला उपक्रम पालघर जिल्हा, वाडा तालुक्यातील पिंजाळ पाडा येथे कपडे, वस्तू वाटप केल्यानंतर दुसरा उपक्रम ठाणे जिल्ह्यातील माहुली गडाच्या पायथ्याशी जुनावना पाडा येथे असलेल्या आदिवासी कुटुंबाना मदत देण्यात आली. या जुनावना पाडा गावात प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना पोहोचण्यास संध्याकाळचे सात वाजले. घरोघरी लाईट पोहोचलेली असताना हा अद्यापही रात्रीचा अंधारात गुडूप होतो. अंधारात कार्यक्रम कसा करायचा हा मोठा प्रश्न संस्थेच्या पदाधिकार्‍यांसमोर उभा होता. पण आपली मदत नागरिकांना पोहोचलीच पाहिजे, याकरिता सर्वांनी मोबाईलची टॉर्च सुरू करुन नागरिकांना साहित्य वाटप केले.
राज्यात गावांमध्ये रस्ते, पाणी, वीजेची चांगल्या प्रकारे सुविधा पुरवण्यात येत असून देखील आजही ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्याच्या पायथ्याशी कित्येक वर्षांपासून असलेले आदिवासी नागरिकांच्या गावात कुठलीच सुविधा नाही. आजही नागरिक कुडाच्या घरामध्ये विजे विना आपला संसार थाटून राहत आहेत. या गावांमध्ये ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान मार्फत दिपावली भेट वस्तू दिल्या नंतर खरोखरच आपण योग्य ठिकाणी मदत केल्याचा आनंद वाटला.- अमोल कदम, अध्यक्ष, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support