Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

मनसेच्या कर्ण बाळा दुनबळेंवरील जीवघेणा हल्ला राजकीय वादातून?




मुंबई । प्रतिनिधी
मनसेचे चेंबूर विभागप्रमुख कर्ण बाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री 10च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात ते जबर जखमी झाले असून मुंबईच्या सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुनबळे यांच्यावरील हल्ला राजकीय वादातून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चेंबूर नाका येथील लाखांची हंडी उभारणारे मनसेचे हंडीफेम नेते म्हणून कर्णा बाळा दुनबळे यांची चेंबूरमध्ये ओळख आहे. मनसेचे एक डॅशिंग नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
शनिवारी रात्री दुनबळे राहत असलेल्या भक्ती पार्क, सिंधी सोसायटी नजीक घराजवळ हा हल्ला झाला. यामध्ये दुनबळे यांच्यावर तलवारीचे वार झाल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखमा झाली आहे. त्यांना रुग्णालयात नेले जात त्यांच्या नाकातूनही रक्तस्राव होत होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. या हल्ल्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दुनबळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेल्या आठवड्यात मनसे चेंबूर शाखाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले होते. त्यामुळे हा हल्ला पक्षातंर्गत राजकारणातून की अन्य कोणत्या कारणातून याचा शोध चेंबूर पोलीस घेत आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support