Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

पुष्पकचा सेवाभावी गरुड


एकदाचा सातार्‍याहुन पुण्याला पोहोचलो. पाच-सव्वापाच वाजले असतील.वरती आभाळाच थैमान चालू झालं होत आणि माझ्या डोक्यात देखील विचारांनी थैमान माजवलं होतं. कारण आज बर्‍याच दिवसांनी त्या सातार्‍यामधील ूल कॉलेजमध्ये बराच वेळ  एकांतात घालवला होता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि तिच्याशी जवळपास 1 मिनीट 12 सेकंदाचाच संवाद झाला होता. बाकी संवाद मुकाच होता.
     स्वारगेटला िाीं च्या स्टॉपवर थांबलो होतो. बराच वेळ झालं डोक्यातलं काहूर शांत होत नव्हतं. आजूबाजुला गर्दीही वाढत होती. अजूनतरी सेनापती बापट रोडला जाणार्‍या बसचा कुठेही थांगपत्ता नव्हता. चर्..चिक..चिक.. या बसच्या जोरात दाबलेल्या ब्रेकच्या आवजाने भानावर आलो! समोर सेनापती बापट रोड वरुन जाणारी बस थांबली आणि अखेर मी मोठ्या कसोशिने मार्गस्थ झालो. बसल्या बसल्या सीटवर एक मोठासा सुस्कारा टाकला आणि तेवढ्यात खाकी वर्दीतील एक निरागस, भाबडं चेहर्‍यावर कृतज्ञतेचा भाव स्पष्ट दिसणार्‍या पन्नाशीतल व्यक्तिमत्व शेजारी येवून बसले. मला जरा त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली. न राहून त्यांच्याशी बोलता झालो. थोडेसे चोचरे बोलत बोलत तेही माझ्याशी संवाद साधू लागले. आणि त्या साध्या सरळ विभूती पलिकडचे लाखमोलाचे कार्य स्पष्ट होवू लागले. 
मी ते सर्व अचंबित होवून ऐकतच राहिलो. त्यांचं नाव होतं शांताराम गरुड आणि ते महानगर पालिकेच्या शव वाहणार्‍या बस पुष्पकवर गेली 12 वर्षे  चालक म्हणून कार्यरत होते. म्हणजे आयुष्यातील एक तप या माणसाने मृत्यूपलिकडच्या माणसांमध्ये घालवले होते. दररोज स्वारगेट डेपो अंतर्गत येणार्‍या संपूर्ण पुणे क्षेत्रातील दोन व्यक्तींच्या पार्थिवाशी सामना होत होता या माणसांचा. कित्येकांची प्रेतं या माणसाने उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. कित्येकांचे रडवलेले मुखवटे हा इसम दररोज पाहत होता. दुर्दशा झालेल्या कुटुंबाची व्यथा याच माणसाने पाहिली होती. 12 वर्षामध्ये न थकता अविरतपने गरुडकाका मृत्यूच्या पलीकडे गेलेल्या माणसांची सेवा करतच होते. पुष्पक हे शव वाहन चालविण्यास दुसरा कोणताच चालक तयार होत नसे. मात्र गरुडकाका खर्‍या अर्थाने पुष्पकाचे गरुड ठरले होते. 12 वर्षात जवळपास 7500 हजार पार्थीव वाहुन नेणारे गरुडकाका आता बोलता बोलता पाप पुण्य आणि खर्‍या अर्थाने सेवा सुश्रुषा काय असते याबद्दल बोलते झाले. मी सुन्न होवून ऐकतच राहिलो. त्या चोचरेपणातून त्यांनी एक किस्सा सांगितला. तो त्यांच्या आयुष्यातील! 
काकांचा टू व्हीलरवरुन वार्जेमध्ये मोठा एक्सिडेंट झाला होता. त्यावेळी तेपीएमटीत बस चालक म्हणूनच काम करत होते. 3 वर्षे कोमात गेल्यावर काका पुन्हा हळूहळू चांगले झाले. तेव्हा त्यांच्या घरच्यांची झालेली दयनीय अवस्था काकांनी पाहिली होती. ती दुःखाची व्यथा जणू त्यांनी तिथूनच प्यायली होती. आणि पुन्हा कामावर रुजू होताना त्यांनी ठरवल होते की जिवंत माणसांची सेवा सुश्रुषा फार झाली आता. या मेलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबसाठी उरलेले आयुष्य सेवा सुश्रुषा करण्यात वेचायच्या. आणि तेव्हापासून आज अखेर पर्यंत हा माणूस तितक्याच निष्ठेने पुष्पकच्या माध्यमातून प्रेतवाहिनिवर कार्यरत झाला. कित्येक आक्रोश ऐकले त्यांच्या कानांनी. आकांत करणार्‍या स्त्रीया-माणसं. गहिवर घालणारे चिमुकले जिव. हंबरडा फोडणार्‍या माऊली. तर कधी शांतपणे केविलवाण्या होऊन त्यांच्या पुष्पक मधून स्मशानाकडे फुंदत चाललेल्या प्रेतयात्रा. बस्स!!!  आता मी पुन्हा अस्वस्थ झालो होतो आणि काका सहजपणे बोलत होते.कल्पनाशक्ति आता माझाच खून करू पाहत होती आणि त्याच क्षणाला माझ्या अंगावर काटा उभा राहिला.मी पुन्हा मोठासा सुस्करा सोडला आणि अखेर त्यांना बोलता बोलता थांबवलंच! त्याचं खूप कौतुक केलं. ती कौतुकाची थाप माझ्यासारख्या त्यांच्या मुलाच्या वयाच्या पोराकडून मिळताना देखील ते तेवेढेच उत्साही आणि समाधानी दिसत होते. आज खर्‍या अर्थाने आयुष्यपणाला लावून सामाजासाठी झटणारा प्रामाणिक समाजसेवक मला भेटला होता. त्या सेवेतच त्यांनी त्यांच्या आयुष्याचा राम पाहिला होता जणू. कोणत्याही पुरस्काराचा मानकरी हा माणूस कधीच झाला नव्हता ना कधी श्रेयवादासाठी हा माणूस रुसला होता! हाच खरा समाजसेवक होता. पण तरीही दुर्लक्षित?     श्रेयवादासाठी... नावासाठी... वैयक्तिक स्वार्थासाठी... नावलौकिकासाठी समाजकार्याच्या नावाखाली समाजालाच थुका लावणारे असामाजिक कार्यकर्ते आजपर्यंत कैक पाहिले होते. पण त्यात शांताराम गरुड कुठेही गवसले नव्हते.गाडगेबाबाही नव्हते आणि नव्हते तिथे कधी आमटे कुटुंब.
बालभारतीच्या कॉर्नरला बस टर्न घेवू लागली तेव्हा मी त्यांच्यासोबत एक माझ्या आठवणीसाठी सेल्फी घेतला आणि पुढच्याच शेती महामंडळच्या स्टॉपवर त्यांचा निरोप घेऊन उतरलो.
आता पुन्हा डोकं गरम झालं होतं. आज तीन प्रसंगांनी तीन वेगळ्या दुनियेचं दर्शन घडवलं होतं. वैयक्तिक, नैसर्गिक आणि सामाजिक जगण्याची.. 
कर्तव्याची सूत्र एकाच दिवसात अनुभवायला मिळाली होती. तिचा, पावसाचा आणि गरुड काकांच्या चिंतनाचा हिशोब करता करता अखेर रूमवर पोहोचलोच आणि मग ही लेखणी तुमच्याशी बोलू लागली. 
अजून अंधारात असणार्‍या खर्‍या समाजसेवकांचा गौरव होणार की नाही. त्यांच्या कार्याचे किमान त्यांना समाधान मिळावे म्हणूनतरी सन्मान होईल की नाही. खरे हीरो फिल्ममध्ये डायलाग मारताना कधीच नाहीत दिसणार, तर ते  समाजाच्या तळागाळात समाजाचा बोझा आपल्या खांद्यावर घेताना दिसतील. त्यांनाच सलाम माझा! तुमच्याकडे असेल एखादा पुरस्कार तर त्या पुरस्काराचाच सन्मान होईल. सेवक पाहून न्याय देण्याचा प्रयत्न करा. परिवर्तन नक्की होईल. आता तुम्हीच ठरवा...खरा समाजसेवक कोण? मला छळणारी ती... लेखनी! तिच्या आठवणीत विचारांचं थैमान माजवणारा तो पाऊस की,मरणोत्तरांची सेवा करणारे ते गरुडकाका? 
-विक्रम मालन आप्पासो शिंदे 7743884307 सातारा
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support