This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

सध्या तोडणारे खूप आहेत

 मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

मुंबई । प्रतिनिधी
सध्या तोडणारे खूप आहेत. पण, जोडणारे आमच्यासोबत आले तर तोडणार्‍यांची ताकद काय, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
शिवसेनेतून भाजपात नुकतेच दाखल झालेले राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील सुफी संतांच्या संमेलनात ते बोलत होते. या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी धार्मिक एकात्मतेचा नारा दिला. चेंबूरच्या फाईन आर्ट सांस्कृतिक केंद्रात या मखमली पीर सुफी संमेलनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हजरत सुफी मखमली पीर यांच्या कामील-ए-इमान या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हजरत सुफी मखमली पीर, खासदार अमर साबळे, आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद, साहिल अग्रवाल, अनिल ठाकूर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश असो वा राज्य, आम्हाला हिंदू आणि मुसलमान सर्व समान आहेत. आज हृदयांना जोडण्याची गरज आहे. तोडणार्‍यांची संख्या सध्या खूप आहे. परंतु जोडणार्‍यांची ताकद आमच्यासोबत असल्याने तोडणार्‍यांची काय मजाल? आपण सारे मिळून या प्रेमसागरात अशा पध्दतीने बुडून जाऊया की देशात भक्ती आणि शक्तीच्या जोरावर सुख शांती कायम राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात निस्वार्थ मनाने देवाची आणि वडिलधार्‍या माणसांची सेवा केली जाते, त्याचप्रमाणे सुफी परंपरेमध्येही माणसांना जोडण्याचे काम केले जाते. या परंपरेत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडते. देशातील सर्व समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव दूर करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यास मिळावे, यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरीने  प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. आपल्यातील देवाला जिवंत ठेवले की, आपल्या हातून चांगले कार्य घडत असते आणि समाजाला आपण एका चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support