Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

पूर्वी दिवाळी दिवाळीलाच यायची!


पूर्वी दिवाळी दिवाळीलाच यायची! अहो खरंच सांगते,  हवं तर नीट आठवून बघा. दिवाळीच्या आधी सर्व शाळांच्या सहामाही परीक्षा संपलेल्या असायच्या, सुट्टीत दरदिवशी अभ्यास लेखन करायची. सायक्लोस्टाईल हातात पडायची. तरीही आम्ही मुले खुश असायचो. घरोघरी दारे खिडक्या सफाईचे अभियान चालायचे. मग एका एका घरातून लाडूच्या भाजणीचा दरवळ यायचा. त्यातच शेजारणी एकमेकींना चकल्या खुसखुशीत कशा होतील यांच्या टीप्स द्यायच्या. सर्व फराळ खूप मेहनत घेऊन बनवला जायचा. घरातील स्त्री तिचं पूर्ण कौशल्य पणाला लावायची. आणि जेव्हा कौतुकाची दाद मिळायची तेव्हा सार्थकी लागायचे.
एक दिवस बाबा कामावरून लवकर घरी येऊन सर्वांची कपडे खरेदी व्हायची. अगदी वाढत्या अंगाचे कपडे घेतले जायचे. आईवडिलांच्या आवडीचे कपडे आवडीने घातले जायचे. फटाक्यांच्या खरेदीनंतर त्यांची सर्व भावंडांत वाटणी व्हायची. अगदी छोट्या लवंगी माळेतून काढून पुरवून पुरवून वाजवण्याची मजा वेगळी होती. मग एका संध्याकाळी सर्व घराबाहेर कंदील सजायचे. करंजीचा,  षटकोनी, चांदणी आकाश कंदील तर खूपच मोहक असायचे.
मला अजूनही आठवते, दिवाळीची रम्य पहाट. बाहेर अजूनही काळोखच असायचा. आम्ही खूप आतुरतेने सकाळची वाट पाहायचो. एरव्ही सकाळी शाळेत जाताना उठायला खूप त्रास. त्या सकाळी मात्र आईच्या एका हाकेसरशी उठायचो. मग सुगंधी उटणे लावून नवीन कपडे परिधान करून देवपूजा व्हायची. दाराच्या दोन्ही बाजूला दोन पणत्या, रांगोळी असायची. फराळाचा नैवेद्य दाखवून शेजारच्या घरी विणलेल्या रुमालाच्या आवरणाखाली ताटात. फराळ भरून दिला जाई. घरातले सर्व एकत्र फराळ करत. तेव्हा कितीही खाल्ले तरी वजन. डायबिटीस, कोलेस्टेरॉल कसली भिती नव्हती. काका, मामा, मावशी, आत्या, असे जवळचे, लांबचे सर्व नातेवाईक फोन, मोबाईल न करता अचानक घरी आले तरी आनंदच वाटत असे. कधी कधी तर पाहुण्यांची वाट पहायचो. तासन्तास गप्पा मारणारे नातेवाईक कोणाला जड वाटत नसत. संध्याकाळी प्रत्येक घर प्रकाशाने उजळून निघायचं, ते चार दिवस घराघरात आनंद भरभरून वाहायचा.
दिवाळीच्या अभ्यासाची वही फटाक्यांच्या आवरण चित्रांनी सजायची. त्याचे मुखपृष्ठ लाल निळ्या जिलेटीन पेपरने घातले जायचे. दिवाळीचे चार दिवस मात्र गरीब, मध्यम, श्रीमंत सर्वांच्या घरी सारखेच असायचे. कारण सण म्हणजे चंगळ नव्हती, त्यात साधेपणा होता. सण हा सणालाच साजरा व्हायचा.
आता पूर्वी सारखी दिवाळी दिवाळीत येत नाही. कारण आपुलकीने भरलेली घराबाहेरची माणसे तितक्याच आपुलकीने स्वच्छ करतील का? चकली तर वर्षभर खाल्ली जाते. नवीन कपडे वर्षभर वेळ मिळेल तेव्हा घेतो. फटाके काय कधीही फोडतो. आता समोरचा दिवाळीला काय भेट वाटतो, ह्यावर पुढचे संबंध टिकतात. तेही तकलादूच ठरतात. फक्त माणसंच माणसांना पूर्वीसारखी भेटत नाहीत. मग कसं म्हणावं बर दिवाळी
आली?
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support