Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांचे प्रतिपादन

भाजप सरकारने केली सर्वसामान्यांची फसवणूक!

  महाड । प्रतिनिधी
देशात आणि राज्यात सत्तेवर बसलेल्या भाजप सेना सरकारने देशातील सर्वसामान्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सर्वसामान्य माणसाची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले असून या फसव्या सरकारला सिंहासनावरून खाली खेचण्याचे काम स्त्रीशक्तीने केले पाहीजे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाड येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा कोकण दौरा सुरू असून या दौर्‍यादरम्यान विविध मतदारसंघात जाऊन त्या महिलांशी संवाद साधत आहेत. महाडमध्ये घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यास चित्रा वाघ यांच्यासह रायगड जिल्हा परीषद अध्यक्षा आदीती तटकरे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाअध्यक्ष प्रमोद घोसाळकर, आमदार अनिकेत तटकरे, प्रवक्ते विजयराज खुळे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शेठ निकम, महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडीक, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा दिपीका चिपळूणकर, प्रदेश महिला सरचिटणीस अपेक्षा कारेकर, अपर्णा जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
आपल्या भाषणात आदीती तटकरे यांनी महिला ज्याप्रमाणे धार्मिक क्षेत्रात जागरूक असतात त्याप्रमाणे त्यांनी सामाजिक आणि राजकीय घडामोडींबाबत देखील अपडेट राहीले पाहीजे, असे सांगितले. तर महिलांना भेडसावणार्‍या समस्यांवर लक्ष घालून त्या सोडवण्याचे काम केले पाहिजे आणि भावनेच्या आहारी न जाता विकासाच्या मुद्यावर मतदान करा, असे आवाहन देखील केले.
भाजप सेना सरकार सत्तेत आल्यापासून महागाई, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी वाढीस लागली आहे. एकीकडे रेशनवर धान्य उपलब्ध नाही आणि दुसरीकडे सिलींडरचे दर वाढवून ठेवले आहेत. उज्वला योजनेच्या नावावर महिलांची फसवणूक केली असल्याने केवळ गॅस कनेक्शन मोफत दिले. उज्वला लाभार्थी यादीत नाव येताच रॉकेल मिळणे बंद झाले. यामुळे घरात रॉकेलही नाही आणि वाढलेल्या महागाईमुळे सिलेंडरही नाही कशी चुल पेटवायची हा महिलांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे, असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support