This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

रितिका ठाकेर, सिमरन संघी यांना रेड बुल शटल अपचे विजेतेपद



मुंबई । प्रतिनिधी 
देशात प्रथमच खास महिलांसाठी भरविल्या गेलेल्या बॅडमिंटनच्या दुहेरी सामन्यांच्या पहिल्या पर्वाची राष्ट्रीय अंतिम फेरी 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कुर्ला इथल्या फिनिक्स मार्केट सिटी येथे पार पडली. रितिका ठाकेर आणि सिमरन संघी या जोडीने प्रतिस्पर्धी जोडी दमन आणि  मुस्कान यांना 11-1, 11-6  अशी जबरदस्त मात देत विजेतेपदावर आपले नाव कोरले. 
रितिका आणि सिमरन यांनी आपली भन्नाट खेळी करून हा विजय मिळवला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. भारताची अव्वल क्रमांकाची शटलर आणि रेड बुल अ‍ॅथलिट अश्विनी पोनप्पा या सामन्यांशी सुरुवातीपासूनच जोडली गेली आहे आणि अंतिम फेरीचा संपूर्ण दिवस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ती सामन्यांच्या स्थळी उपस्थित होती. इतकेच नव्हे तर अश्विनी व तिची सोबती सिक्की रेड्डी यांनी विजेत्या जोडीसोबत एक मैत्रीपूर्ण सामनाही खेळला. विजेत्यांसाठी हा एक सुखद धक्काच होता.  
बॅडमिंटन या खेळाची प्रेक्षकसंख्या (5 वा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ) आणि प्रत्यक्ष खेळातला सहभाग (दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक खेळला जाणारा खेळ) अशा दोन्ही पातळ्यांवरील लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या खेळाला आणखी थोडी चालना मिळावी आणि होतकरू महिला खेळाडूंमध्ये या खेळाची लोकप्रियता वाढून त्यांचा या खेळातील सहभाग वाढावा या हेतूने हे सामने खेळवले 
गेले. 
रेड बुल शटल अपच्या पात्रता फेर्‍या - दिल्ली, बेंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद आणि मुंबई अशा पाच शहरांमध्ये खेळवल्या गेल्या. प्रत्येक शहरातील पात्रता फेर्‍यांमधील विजेत्या जोडीला मुंबईमध्ये राष्ट्रीय फायनल्स खेळण्यासाठी मुंबईत आणले गेले. दिल्लीहून छवी आणि नझ्मा, बेंगळुरूच्या पार्वती एस. कृष्णन आणि दिव्या आनंदन, हैदराबाद येथील अपर्णा आणि मैत्रेयी, गुवाहाटी येथील आरती पुर्बे आणि प्रतिक्षा पाठक व मुंबईतील रितिका ठक्कर आणि सिमरन सिंघी यांचा अंतिम फेरीत समावेश होता. याखेरीज चंदिगढ येथील दामन राजकुमार आणि मुस्कान ताया यांच्या जोडीलाही वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. या सामन्यांसाठीच्या लकी लूझर्स नावाच्या पात्रता निकषामुळे या जोडीची निवड झाली. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support