Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

अँकिलॉसिंग स्पाँडिलायटिस


अँकिलॉसिंग स्पाँडिलायटिस हा एक ऑटो- इम्युन विकार असून त्याचे भारतातील प्रमाण वाढते आहे. प्रौढांमध्ये 100 जणांपैकी एकाला याचा त्रास आहे. हा विकार पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळत असून, विशीच्या शेवटच्या टप्प्यात आणि तिशीच्या सुरुवातीच्या टप्प्यात याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका पाठीचा खालील भाग, नितंब आणि मांड्यांमध्ये दोन्ही बाजूंना किंवा एकाच बाजूला तीव्र वेदना सकाळी जाणवणारा ताठरपणा, जो जाण्याकरिता कित्येक तास लागतात हा संधिवाताचाच एक प्रकार असून, यात पाठीचा कणा आणि मोठे सांधे जसे की हिप्समध्ये ताठरपणा व वेदना जाणवतात आणि पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. या अवस्थेमुळे हाडांची अतिवाढ (ओव्हरग्रोथ) होऊ शकते. याचा परिणाम म्हणून ती विचित्रपणे एकमेकांमध्ये गुंतू (वेल्डिंग प्रमाणे) लागतात आणि व्यक्तीला दैनंदिन हालचालीही कठीण होऊन बसतात.
ही अवस्था प्रामुख्याने आढळते ती रक्तात एचएलए- बी27 हे प्रतिजन असलेल्या व्यक्तींमध्ये. एचएलए-बी27 हे प्रतिजन म्हणजे श्वेत रक्तपेशींच्या पृष्ठभागावर आढळणारे एक प्रथिन आहे. हे प्रथिन रोगप्रतिकार यंत्रणेतील आरोग्यपूर्ण पेशींवर हल्ला करते आणि रोगप्रतिकार यंत्रणेत बिघाड घडवून आणते. याचा परिणाम म्हणून एएससारखी अवस्था निर्माण होते.
पाठीचा कणा निरोगी असेल, तर ती व्यक्ती अनेक दिशांना हालचाल करू शकते तसेच वाकू, वळू, तिरकी वळू शकते. मात्र, अँकिलॉसिंगस्पाँडिलायटिस मुळे ठिसूळ झालेला पाठीचा कणा हे सर्व करू शकत नाही. ठिसूळ झाल्यामुळे पाठीच्या कण्यातील हाडे एकमेकांमध्ये गुंततात आणि रुग्णाला कोणत्याही दिशेने पाठीचा कणा हलवणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे या विकाराच्या पुढील टप्प्यात रुग्णाला विकलांगता येते. अँकिलॉसिंग स्पाँडिलायटिस मधील हिप जॉइंट वारंवार बिघडते, ज्यामुळे बसायला व चालायलाही त्रास होतो. बैठी जीवनशैली, विचित्र आसनस्थिती, प्रचंड तणाव आणि दीर्घकाळ कामाने येणारा थकवा यामुळे तरुणांमध्ये हाडे आणि सांध्यांच्या विकारांचा धोका वाढत आहे.
या अवस्थेचा सामना या अवस्थेचे निदान साधारणपणे शारीरिक तपासणीद्वारे, पाठ व ओटीपोटाच्या एक्स-रेद्वारे आणि काही लॅब चाचण्यांद्वारे केले जाते. हा आजार पूर्ण बरा करण्यासाठी त्वरित उपचार नसले, तरी त्यातील वेदना व ताठरपणाच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. या उपचारांच्या मदतीने विकलांगता टाळता येते तसेच ऑक्युपेशनल व फिजिकल उपचारपद्धती, व्यायाम व औषधांच्या मदतीने व्यक्तीची दैनंदिन कामे करण्याची क्षमता जतन करता येते. ब-याच फिजिकल उपचारपद्धतीमध्ये, प्रभावित सांध्याभोवतालचे स्नायू मजबूत केले जातात. यामुळे सांध्याची हालचाल सुधारण्यात मदत होते.
मात्र, विकार विकोपाला गेलेल्या रुग्णांमध्ये संपूर्ण नितंब प्रत्यारोपण (टीएचआर) हाच वेदना कमी करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा मोठ्या कालावधीचा उपाय आहे. या प्रक्रियेत, पार्श्वभागातील हिप सांध्यांच्या काही प्रभावित भागांच्या जागी कृत्रिम बॉल व सॉकेट बसवली जातात. यामुळे सांध्यांची कार्यात्मक हालचाल पुन्हा सुरू होते आणि वेदनेपासून मुक्ती मिळते. या उपचारामुळे पाठीच्या कण्याचे आरेखन(अलाइनमेंट) आणि समतोल पूर्ववत होते. त्यामुळेच रुग्णाची नैसर्गिक ठेवणही पूर्ववत होते.
टीएचआरनंतर 3 आठवड्यांनी विशालला कमी तीव्रतेच्या हालचाली, उदाहरणार्थ उठून बसणे आणि गुडघे, नितंब, पाऊल घोट्याचे बिछान्यात करावयाचे व्यायाम सांगण्यात आले, जेणेकरून प्रत्यारोपणे हाडांमध्ये मिसळतील. ज्या तरुणाला उभे राहण्याचीही आशा वाटत नव्हती, तो उपचारानंतर चौथ्या आठवड्यात प्रथमच चालला. हा आजार झाल्यापासून त्याचे आयुष्य बिछान्यापुरते मर्यादित झाले होते.पुढील दोन महिने विशालला स्नायू मजबूत करण्यासाठी फिजिओथेरपी देण्यात आली. त्यामुळे त्याच्या हालचालींमध्ये आणखी सुधारणा झाली.
अँकिलॉसिंग स्पाँडिलायटिस हे हळुहळू तरुणांमधील उत्पादनक्षम कालखंडावर परिणाम करणारे प्रमुख कारण झाले आहे. या अवस्थेचाआपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि या आव्हानावर मात करण्यासाठी शक्य ते सर्व काही केले पाहिजे. ”अँकिलॉसिंग स्पाँडिलायटिस सह टीएचआर थेरपीने रुग्णांना नवीन आशा दिली आहे. तसेच ही शस्त्रक्रिया करण्याच्या आधुनिक पद्धतींनी रुग्णाला केवळ काही दिवसच हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि तो शस्त्रक्रियेच्या दिवशीच चालू देखील शकतो.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support