Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

ठाणे भाजपात खंडणीखोरांचा सुळसुळाट!

सुधीर बर्गेनंतर माजी नगरसेवक राजकुमार यादवलाही बेड्या
ठाणे, भाजपात खंडणीखोरांचा सुळसुळाट!, how ठाणे, must ठाणे, should ठाणे,

बसपा नगरसेविकेच्या पतीची 420 गिरी
कल्याण पालिकेतील बसपाची नगरसेविका सोनी अहिरे-पगारे यांचा पती नितीन पगारे (33) व त्याचा साथीदार राकेश साळुंखे (30) या दोघांना 45 ते 50 बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी खंडणी पथकाने अटक केली. या दोघांनी इच्छुकांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये स्वीकारले होते. पगारेकडे 2 पिस्तुल, एक रिव्हॉल्व्हर, 18 जिवंत काडतूसे असा शस्त्रसाठा, सेंट्रल रेल्वेचे बनावट शिक्के व बनावट लेटरहेड हा साठा सापडले आहे. त्याने बेकायदा शस्त्रविक्रीचा त्याने धंदाच थाटल्याचेही समोर आले आहे.
ठाणे । प्रतिनिधी
विकासकांना ब्लॅकमेल खडणीसाठी धमकावणार्‍या पदाधिकार्‍यांचा भाजपत सुळसुळाट वाढला आहे. हिरानंदानी बिल्डरकडे 50 लाखांची खंडणी मागिल्याच्या प्रकरणात भाजपाचा माजी नगसेवक सुधीर बर्गे याला उचल्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथकाने भाजपाचा माजी नगरसेवक राजकुमार यादव यालाही गुरुवारी बेड्या ठोकल्या असून या प्रकरणात आणखी आजी-माजी नगरसेवकांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.
माहिती अधिकार कायद्याचे हत्यार वापरून ठाण्यातील बिल्डर, कंत्राटदार, व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचा गोरखधंदा थाटणार्‍या भाजपच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोठे रॅकेटच काम करत असल्याचे उघड झाले आहे. बर्गेसोबत यादवनेही हिरानंदानी बिल्डरकडे घोडबंदर येथील गृह प्रकल्पावरून आरटीआयच्या आडून 50 लाखांची खंडणी मागितली होती. यातील 5 लाख रुपये बर्गेने स्वीकारले होते. त्यापैकी दीड लाख रुपये यादवने खिशातही घातले होते. या प्रकरणात ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके 
यांच्या पथकाने यादवला अटक केली असून न्यायालयाने त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यादवची आई केवलादेवी यादव इंदिरानगरमधील प्रभागातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. तर वडील रामनयन यांनीही नगरसेवकपद  भूषवले होते.
Tags:ठाणे, भाजपात खंडणीखोरांचा सुळसुळाट!, how ठाणे, must ठाणे, should ठाणे, 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support