This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

भिवंडीत ऐन दिवाळीत शिवसेनेला मोठे खिंडार

  माजी नगरसेवकासह विभागप्रमुख, शाखाप्रमुखांचा मनसेत प्रवेश

भिवंडी । प्रतिनिधी
भिवंडी शहर परिसरातील शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून शिवसेनेत फाटाफूट सुरु असतानाच बुधवारी शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बालाजी गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसेत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये विभाग प्रमुख, शाखा प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांचा समावेश असल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. भादवड तलाव समोरील मोकळ्या मैदानात शिसैनिकांच्या प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, भिवंडी लोककसभा अध्यक्ष मदन (अण्णा) पाटील, सचिव संजय पाटील, महेंद्र बैसाने, शैलेश बिडवी, शहराध्यक्ष मनोज गुळवी, प्रदीप बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. 
या प्रवेशामध्ये शहरातील काप आळी, गायत्रीनगर, कोंबडपाडा, नवीवस्ती, वेताळपाडा, नागांव तर ग्रामीण भागातील पुर्णा, लाप, गोरसई, सावंदे येथील शिवसैनिकांचा समावेश असून यामध्ये माजी नगरसेवक सुनील (बाबा) शिंदे, विभाग प्रमुख  सुुरज ठाकूर, महेंद्र साळवी, संतोष जाधव, सागर पवार, प्रतीक मोरे, कृष्णा सरोदे, राहुल मोरे, मुकेश जयस्वाल, शेखर जाधव, अवेश मोमीन, आरिफ शेख, अवेश शेख, नितीन पाटील, आशिष केणे, शैलेश घोटकर, विशाल गंगे, राहुल पाटील, मोनिष केणे, परेश केणे, अजय पाटील, सागर डावरे, आकाश चौधरी, शैलेश वैद्य, गोवर्धन देवळीकर, रविंद्र केणे, सागर धुमाळ, ज्ञानेश्वर मुकादम, मयूर केणे, भावेश घोटकर, वैभव केणे, हिमांशू ठाकरे, धिरज केणे, दैवत केणे, सद्दाम शेख, नासिर शेख, हिमांशू भोईर, मुस्ताक शेख, फरीद शेख, तौसिफ शेख, श्रीधर चौधरी, तुषार मिटकर, हर्षल खंडांगळे, नरेंद्र पाटील, जय इताडकर, शुभम टावरे, अतिष पाटील, विकी टावरे, विकी मिटकर, रोशन पाटील, करण चौधरी, मयूर चौधरी, हेमंत भोई ,दिवेश इताडकर, सागर खंडागळे, देवेश जाधव आदींसह शेकडो शिवसैनिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support