Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

स्तनाचा कर्करोगासाठी लवकर निदान हाच उपचार


आरोग्यदायी राहणे सर्व महिलांसाठी, विशेषत: कामावर जाणार्‍या महिलांसाठी महत्त्वाचे आहे. पण फिटनेस पातळ्यांची तपासणी करण्यासोबतच नियमित आरोग्य तपासणी व नित्यनेमाने करण्यात येणार्‍या चाचण्या हे देखील महिलांच्या तपासणी यादीमध्ये समाविष्ट असले पाहिजेत. अनेकदा या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. उपचार होऊ शकणार्‍या आरोग्यविषयक संभाव्य आजारांच्या निदानासाठी करण्यात येणार्‍या स्क्रिनिंग चाचण्या योग्यरित्या होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
महिलांनी अशाच एका आजाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, तो म्हणजे स्तनाचा कर्करोग. भारतातील महिलांमध्ये सर्व कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 27 टक्के आहे. हा आजार वयाच्या तिशीमध्येच दिसून येत आहे आणि वयाच्या 50 ते 64 वर्षांमध्ये अधिक वाढताना दिसत आहे. असा अंदाज आहे की 28 महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात कधीतरी स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे. वाढत्या वयासह स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढत असली तरी भारतात स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण 40 वर्षांहून कमी वयाच्या तरुण महिलांसोबतच शहरी भागातील काम करणार्‍या महिलांमध्ये वाढलेले दिसण्यात आले आहे. लवकर होणारा स्तनाचा कर्करोग हा वयाच्या उत्तरार्धात होणार्‍या स्तनाचा कर्करोगापेक्षा अधिक धोकादायक असतो. म्हणूनच आधुनिक सर्जिकल तंत्रे व केमोथेरेपी औषधे असताना देखील आजार होण्याचे व आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि असे अनेक वर्षांपासून घडत आलेले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच स्तनाचा कर्करोगाचे निदान करणे. 
स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित अनेक चाचण्या पुढील एक किंवा अनेक विभागांमध्ये मोडतात - स्क्रिनिंग चाचण्या (जसे वार्षिक मॅमोग्राम्स), या चाचण्या स्तनाचा कर्करोग जाणवत नसलेल्या लोकांसाठी नियमितपणे केल्या जातात, तसेच कोणतीही लक्षणे विकसित होण्यापूर्वी स्तनाचा कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी या चाचण्या केल्या जातात. ज्यामुळे कर्करोगावर सहजपणे उपचार करता येतो. डायग्नोस्टिक चाचण्या (जसे बायोप्सी), या चाचण्या स्तनाचा कर्करोग जाणवत असलेल्या लोकांसाठी केल्या जातात. लक्षणांच्या किंवा स्क्रिनिंग चाचणीच्या माध्यमातून त्यांना या आजाराची चिन्हे दिसत असावी. मॉनिटरिंग चाचण्या, स्तनाचा कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचार ठरवण्यासाठी आणि उपचारानंतर थेरेपीज कशाप्रकारे काम करत आहेत यावर देखरेख ठेवण्यासाठी या चाचण्या केल्या जातात. मॉनिटरिंग चाचण्या पुन्हा आजाराच्या चिन्हांच्या तपासणीसाठी देखील वापरता येऊ शकतात. या चाचण्यांव्यतिरिक्त महिला स्वत:हून स्तनावर किंवा गळ्याच्या हाडाखालील भागावर गाठ आली आहे का याची तपासणी करू शकतात. 
महिलांनी वयाच्या 20व्या वर्षानंतर दर एक ते तीन वर्षांनी आणि वयाच्या 40व्या वर्षानंतर दरवर्षी स्तनाची क्लिनिकल चाचणी केली पाहिजे. स्तनाच्या कर्करोगासंदर्भात कौटुंबिक इतिहास असल्यास स्तनाची क्लिनिकल चाचणी वारंवार केली पाहिजे. 
स्वत:हून स्तनाची तपासणी करणे हा देखील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे शोधण्याचा उत्तम मार्ग आहे. रोज तपासणी केल्यास स्तनातील सामान्य ऊती व असामान्य नवीन बदल यामधील फरक जाणवतो. स्तनाचा कर्करोगाची लक्षणे सर्व महिलांसाठी समान नसतात. खाली स्तनाच्या कर्करोगाची काही सामान्य लक्षणे दिली आहेत : 
  • • वेदना न होणारी कडक गाठ, जिची हालचाल होत नाही. 
  • • स्तनाचा आकार किंवा घडणीमध्ये बदल
  • • त्वचेवर खळगे किंवा सुरकुत्या तयार होणे 
  • • स्तनाग्राला खाज सुटणे, स्तनाग्राजवळ दुखणे किंवा स्तनाग्रावर पुरळ येणे 
  • • स्तनाग्र किंवा स्तनाच्या इतर भागाला त्रास होणे 
  • • स्तनाग्राची एक बाजू लालसर होणे 

2008-2012 दरम्यान हा आजार होण्याच्या प्रमाणामध्ये 11.54 टक्क्यांच्या वाढीसोबतच आजारामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणामध्ये 13.82 टक्के वाढीसह भारत या आव्हानात्मक स्थितीचा सामना करत आहे. कर्करोगाची संभाव्य लक्षणे ओळखत योग्य ती काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लवकर निदान. कर्करोगाचे लवकर निदान उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढवते. कर्करोगाच्या लवकर निदानाचे दोन प्रमुख घटक आहेत - लवकर निदान व स्क्रिनिंगला चालना देण्यासाठी जागरुकता. डॉक्टर्स, परिचारिका व इतर हेल्थकेअर प्रदात्यांसोबतच सामान्य जनतेमध्ये कर्करोगाच्या संभाव्य लक्षणांबाबत वाढती जागरूकता आजारावर उत्तम परिणाम करू शकते. 
डिजिटल मॅमोग्रामसह टोमोसिन्थेसिस हे लहानात लहान कर्करोगाचे निदान करण्यासाठी अत्यंत उत्तम साधन आहे. अनेक महिलांना दाबाच्या वेदनांमुळे मॅमोग्राम करण्याची लाज वाटते. पांरपरिक मॅमोग्राफी पद्धतींच्या तुलनेत डिजिटल मॅमोग्राम हे कमी वेदनादायी आहे आणि रेडिएशन डोस देखील 40 ते 50 टक्के कमी आहे. 3डी टोमोसिन्थेसिस सारख्या प्रगत तंत्रज्ञानांसह 1 मिमी आकाराच्या स्तनाची देखील तपासणी होऊ शकते, ज्यामुळे वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते.
एकूण कर्करोग प्रोजेक्शन डेटा दाखवतो की 2020 पर्यंत कर्करोगाचे प्रमाण जवळपास दुप्पट होईल. कर्करोग होण्याच्या वाढत्या घटना विद्यमान डायग्नोस्टिक/उपचार सुविधा अधिक प्रबळ व सुधारित करण्याच्या गरजेला दाखवतात. या सुविधा अपुर्‍या असून भारतातील कर्करोगाचा सध्याचा भार हाताळण्यामध्ये असक्षम आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support