Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

कल्याण महापालिकेत मृत्यूचे सौदागर

अवघे कल्याण गुरुवारी थबकले असणार. हळहळत तर होतेच. चक्कीनाका परिसरातील एक विहिर पाचजणांसाठी मौत का कुवाँ ठरली. या विहिरीतील रसायनमिश्रित पाण्याच्या विहिरीने पाचजणांचा घास घेतला. त्यात अग्निशमन दलाचे दोन जवानही होते. या विहिरीत शेजारच्या नाल्यातील रसायनांचे घातक सांडपाणी मिसळत होते. त्यातून विषारी वायू निर्माण झाला होता. अशी विषारी विवर ठरलेली विहिर साफ करण्यासाठी कमलेश यादव हा कामगार उतरला होता. तो अर्थातच गुदमरून, तडफडून मृत्यूमुखी पडला. तो बाहेर का आला नाही पाहाण्यासाठी तिथल्याच गोस्वामी कुटुंबातील राहुल हा तरूण विहिरीत उतरला, मुलगा बाहेर येत नाही म्हणून राहुलचे वडिल गुणवंत तथा गुणाभाई गोस्वामी उतरले. हे दोघेही मरण पावले. या तिघांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाचे दोन जवान विहिरीत उतरले, त्यांचाही या विहिरीने बळी घेतला. अवघ्या कल्याणकरांचेच नव्हे तर संवेदनशील अशा प्रत्येकाचे हृदय हेलावून टाकणारी ही घटना. पण या दुर्घटनेत प्रथमदर्शनी विहिर आणि विषारी वायू यांच्यावर दोष जात असला तरी या मृत्यूंना जबाबदार असणारे मृत्यूचे सौदागर कल्याण-डोंबिवली महापालिकेत बसले आहेत. त्यांच्याच निष्क्रियतेने, बेफिकीर, बेपर्वा कारभाराचे हे पाच बळी आहेत. शेजारच्या नाल्यातून येणारे रसायनांचे सांडपाणी या विहिरीत मिसळून गेली काही वर्षे येथे विषारी वायू तयार झाला होता. मृत्यूने सापळा रचला होता, तो दडून बसला होता.  या विहिरीशेजारून जाणार्‍या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहीरीत मिसळले जात आहे. त्याची सफाई करा, विहिर स्वच्छ करा यासाठी मंदिर परिसरातील गोस्वामी कुटुंबाने प्रशासनाकडे पाठपुरावा चालवला होता. तब्बल तीन वर्षे हा पाठपुरावा गुणाभाई करत होते, राहुल खेपा घालत होता पण, महापालिकेतील प्रशासन, संबंधित खाते ढिम्म होते. प्रशासन आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करते आहे, अजिबात हलत नाही यामुळेच अखेर गोस्वामी यांनी स्वत:च विहिर सफाईचा निर्णय घेतला आणि तेच दुर्दैवी ठरले. गटाराचे सांडपाणी मंदिर परिसरात व विहिरीत जात असल्याची तक्रार महापालिकेकडे तीन वर्षांपासून करण्यात येत होती. आणि तरीही संबंधित अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. मंदिराचे विश्वस्तही महापालिकेकडे या सांडपाण्याची तक्रार करत होते. येथील नगरसेवक नवीन गवळी यांनीही हा विषारी सांडपाण्याचा नाला आणि विहिर याविषयी महापालिकेकडे तक्रार केली होती. नगरसेवकच सांगतात म्हणून महापालिकेचे अधिकारी त्यावेळी विहीरीकडे चक्कर मारून गेले होते. पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. यामुळेच गोस्वामी यांना कामगार विहीरीत उतरवावा लागला, त्यानंतर त्यांनी मुलगा गमावला आणि नंतर स्वत:चा जीवही. या तिघांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे अनंत शेलार हे जवान आधी उतरला तेही गुदमरून गेले. त्यांना वाचवण्यासाठी उतरलेले जवान प्रमोद वाघचौरे हे जवानही मृत्युच्या मुखात गेले. आता महापालिकेतील कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. महापौरांपासून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत सर्वजण दोषींवर कारवाई करा, असे म्हणत आहेत. खासदार शिंदे यांनीही, या घटनेची तातडीने चौकशी करून दोषी असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. महापालिका अधिकार्‍यांचा यात दोष आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सांगितले जाईल, असे म्हटले आहे. कल्याण महापालिकेतील बेपर्वाईचे हे एकमेव उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. डोंबिवली, कल्याणच्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष नागरिक विसरलेले नाहीत. महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुर्दशा, ग्रामीण भागांतील सुविधांकडे कानाडोळा, कचराभूमीचा धुमसता प्रश्न ही मोजकी उदाहरणेही महापालिकेतील अनागोंदीकडे बोट करतात. महापालिकेतील याच अनास्थेमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. आणि खड्ड्यांनी घेतलेले बळी त्याचेच निदर्शक होते. खुद्द कल्याणमध्ये एकाच रस्त्यावर तीन वेळा अपघात होऊन तीन बळी गेले होते. तरीही महापालिका निगरगट्टपणा दाखवून बेफिकिर होती. शेवटी नागरिकांनी मोर्चा काढल्यावर या रस्त्याची दुरुस्ती कऱण्यात आली. अशा अनेक गोष्टींची जंत्री वाचता येईल. या बेपर्वाईचा विद्यमान आयुक्त गोविंद बोडके यांनी समाचार घ्यावा इतकीच नागरिकांची अपेक्षा आहे. महापौर विनिता राणे या कार्यकुशल आहेत. त्यांच्याकडूनही या कारभारावर वचक अपेक्षित आहे. याच अपेक्षेने नागरिकांनी त्यांना निवडून दिले आहे. नाल्याच्या सांडपाण्याबाबत नगरसेवक नवीन गवळी यांना येथील सफाई लगेच करतो असे संबंधित ठेकेदार आणि प्रभाग समिती अधिकारी यांनी सांगितले होते. पण त्यावर प्रत्यक्ष हालचाली झाल्याच नाहीत. अशा अक्षम्य आणि जिवघेण्या बेपर्वाईबद्दल आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करायलाच हवी. महापालिकेचे सर्व कर भरणार्‍या नागरिकांची महापालिकेकडून हीच अपेक्षा आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support