Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

महाराष्ट्रभूषण भाईजी...मा .राधेश्याम चांडक भाईजी,
संस्थापक व अध्यक्ष बुलडाणा अर्बन
सप्रेम नमस्कार,
मी अस्सल मुंबईकर, माझा जन्म रायगडच्या पायथ्याशी झाला असला तरी माझं बालपण आणि शिक्षण मराठी संस्कृतीचा मुकुट मिरविणार्‍या गिरगावात झाला. भाईजी, हे सांगण्याचा उद्देश असा की, माझ्यासारख्या मुंबईकराला ‘भाई’ या शब्दाची नेहमीच भीती वाटत आली आहे. गिरगाव म्हणजे सांस्कृतिक विचारांचा पगडा आणि त्याचं जाळं मराठी घरांत दिसतं. याच गिरगावात कम्युनिस्ट नेते भाई डांगे, भाई अप्पा पेंडसे, भाई वैद्य, भाई गुलाबराव गणाचार्य असे अनेक नेते मुंबईत गल्लीबोळात वैचारिक भाषणे देत होते. त्यांच्या विचारांवर पोसलेले माझ्यासारखे,  या भाईंची भाषणे होणार म्हटलं की, सगळे तत्कालीन तरुण हमखास एकत्र येत होते. आमच्या हृदयात कोरलेल्या भाईंची जागा, मुंबईतल्या दादालोकांनी स्वतःच्या कपाळावर कोरली आणि ते उजळमाथ्याने फिरू लागले. नुसते फिरू लागले नाहीत तर राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. आणि काय सांगू भाईजी तुम्हाला, रस्त्यात कोणाला साधं भाई हाक मारली तरी लोकं त्याच्याकडे संशयित नजरेने पहातात. परंतु सोमवारी तुमच्या बुलडाणा अर्बनच्या शिवाजी पार्क येथील शाखेचे उद्घाटन झाले आणि तुमच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मंत्री संत्री होते, खरं म्हणजे ते ‘राजकारणीच’ होते. समाजकारणात भाई, राजकारणात भाई, शिक्षणक्षेत्रात (लातूर पॅटर्न) भाई, आता नुकताच एकेकाळी भाई म्हणून ओळखला जाणारा एका भाईने हॉस्पिटल उभारले आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण सात लाख लोकांच्या हृदयात स्थान पटकावले आहे आणि सर्वजण आपणांस भाईजी म्हणून ओळखतात आणि माझा जीव भांड्यात पडला आणि भाई शब्दाला भाईजीच्या रूपात सभ्यपणाचे दर्शन घडू लागले. ज्याने कोणी तुम्हाला भाई नाव न ठेवता भाईजी नाव ठेवले. त्याचे प्रथम आभार मानले पाहिजेत. माझ्यासारख्या मुंबईकरांना भाई म्हटला की अरुण भाई, दाऊद भाई ही खुनखराबा करणारी माणसे समोर येतात. आपल्या बुलडाणा अर्बनच्या कार्यक्रमाला येताना हे चांडक भाईजी क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि बँकेशी संबंधित. गैरव्यवहार असणारच. असा गोड समज का निर्माण होतो? कारण त्या कार्यक्रमात मंत्रीच होते. आता मंत्री असणार म्हणजे बँकेची लफडी निस्तरण्यासाठी त्यांना तुम्ही बोलाविले असणार, असे माझ्यासारख्याच्या मनात ‘भाई’ या शब्दामुळे एकसारखा घोळू लागला. परंतु पत्रकार म्हणून माझ्या हातात आलेली माहिती वाचल्यानंतर तुमच्याविषयीचा गैरसमज दूर झाला.
1986 मध्ये बुलडाणासारख्या वाळवंटात हिरवेपणा आणण्याच्या आपल्या प्रयत्नाला भाईजी दाद द्यावी लागेल, त्यासाठी आपणांस माझ्याकडून अस्सल मराठी ‘मानाचा मुजरा’...!  केवळ 12 हजार रुपयांच्या भांडवलावर ‘बुलडाणा अर्बन’चं रोपटं लावलं तेही शंभर पण नाही, फक्त 72 लोकांच्या मदतीने... छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्यासाठी काही थोड्या मावळ्यांच्या साथीने सैन्य उभारले. बलाढ्य मोगलाईला त्यांनी आव्हान दिले... हे घडलं ते शिवबांवर मावळ्यांचा असलेला ठाम विश्वास... आता काय तर तुमची बुलडाणा अर्बन, फक्त 72 लोकांना घेऊन उभी केली, आज सात लाखांहून सदस्य साथ साथ तुमच्यामागे आहेत. तिचं आजचं साम्राज्य पाहून मंत्री देखील तोंडात बोट घालून आणि उघडपणे नाहीच, मात्र मनातल्या मनात  म्हणत असतील ‘आमच्याकडे सत्ता आहे, भाईजींकडे साम्राज्य आहे!’ बरोबर ना भाईजी...?
भाईजी, बुलडाणा अर्बनच्या सुरुवातीच्या काळात आपल्याकडे शेतकरी आणि सामान्य जनता भांडे, सायकल, गाई, बकर्‍या, मेंढ्या, धान्य  रक्कम मिळावी म्हणून ते ठेवत होते. त्यावेळी सर्वांना तुम्ही आणि आपली क्रेडिट सोसायटी हक्काची वाटत होती आणि त्यातून हा घरोबा वाढला व त्या घरोब्याचे तुम्ही प्रमुख झालात. मग काय घरातली कर्त्या पुरुषाप्रमाणे जबाबदारी ओळखून आपण शैक्षणिक, आरोग्य या समस्या हाताळताना शेतकर्‍यांच्या धान्य साठवणुकीसाठी ‘शाखा तिथे गोदाम’ ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. आता काय गोरक्षण धाम, वेदविद्या धाम, बुलडाणा जिल्ह्यातील मुलांना अधिक चांगले शिक्षण मिळावे म्हणून पुण्यात वसतिगृह, तिरुपती, माहूर, ओंकारेश्वर येथे भक्तांसाठी भक्त निवास उभारलेत. विकलांगांसाठी जयपूर फूट देऊन अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे महत् कार्य आपण करीत आहात. तुकडोजी महाराजांच्या उपदेशाला कृतीची जोड आपण दिलीत. बुलडाणा अर्बनचा डोलारा सांभाळताना सामाजिक भान हा आपल्या कार्यशैलीचा पैलू आहे आणि कालानुरूप बदल ही विचारशैली आपल्या कर्तृत्वात भर घालत आहे आणि या कर्तृत्वाची भरारी भविष्यात विदेशातही दिसू लागली तर त्याची दखल भरकटलेल्या राजकारण्यांना घ्यावी लागेल. सध्या मुंबईत बुल इंडियाचा डोलारा डोलतोय, पण आर्थिक राजधानी मुंबईत आपला ‘बुल’डाणा कमी नाही हेच आता भविष्यात दाखवायचे आहे.
बुलडाणा अर्बनच्या शिवाजी पार्क शाखेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी काही आडपडदा न ठेवता तुम्हाला अनमोल सल्ला दिला की, तुम्ही राजकारणात पडण्याच्या भानगडीत पडू नका. आपणही त्यावेळी ते शांत चित्ताने ऐकून घेतले. आनंदराव अडसूळ यांच्या बोलण्यातला अर्थ कळला असेल. नाहीतरी मंत्री त्यांच्या पदावर असतात तोपर्यंत त्यांची आरती अनेकांकडून उतरवली जाते, सत्तेवरून उतार झाल्यावर मंत्रालयात खरेखुरे भटके कुत्रेही त्यांच्याकडे  ढुंकूनही पहात नाहीत. एवढेच कशाला लिफ्टमन त्या मंत्र्याला ते लिफ्टजवळ आल्यावर थांबा म्हणून सांगून नंतरच्या फेरीत तुमचा नंबर असल्याचे सांगतो आणि लिफ्टच्या लाईनीतील कर्मचारी तोंडावर हात ठेवून हसत असतात. आहे की नाही काळाचा महिमा?  म्हणून भाईजी, तुम्ही या राजकारणात डोकावण्याचाही प्रयत्न करू नका! तुमचं सात लाखांपेक्षा अधिक लोकांच्या हृदयात अधिराज्य आहे. तेही कायमस्वरूपी! नशीबवान आहात तुम्ही! भाईजी, तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगतो, शिर्डीचे साईबाबा यांच्यासाठी शिर्डी संस्थानने सोन्याचे सिंहासन बनविण्याचा निर्णय घेतला आणि बाळासाहेबांनी त्या सिंहासन बनविण्यास विरोध केला. त्यावेळी दैनिक लोकमतने बाळासाहेब स्वतः चांदीच्या सिंहासनावर बसतात आणि साईबाबांच्या सिंहासनाला विरोध करतात, असे वृत्त प्रसिद्ध केले आणि बाळासाहेबांना हे वृत्त कळताच त्यांनी स्वतःचं सिंहासन लोकमतच्या कार्यालयात पाठवून दिले आणि निरोप पाठविला हे घ्या माझे चांदीचा पत्रा लावलेले सिंहासन! लोकमतच्या कार्यालयात बाळासाहेबांचं सिंहासन पाहून तत्कालीन संपादक दिनकर रायकर यांची तारांबळ उडाली. त्यांनी ते सिंहासन घेऊन मातोश्रीवर परत करण्याच्या उद्देशाने नेले. परंतु बाळासाहेबांनी ते सिंहासन काय घेतले नाही आणि वर सुनावले मला सिंहासनाची गरज नाही, मी जिथे बसतो तेच माझे सिंहासन आहे. भाईजी माझ्या बोलण्याचा अर्थ कळला असेल.  तुमचं स्थान सत्ताधार्‍यांपेक्षा कितीतरीपटीने मोठे आहे. तुम्ही सत्तेकडे जाण्याची गरज नाही, सत्ता तुमच्याकडे येईल. बघा ना भाईजी, सोमवारच्या कार्यक्रमात केंद्रीय आणि राज्यातील मंत्री आणि दस्तुरखुद्द विधानपरिषदेचे सभापती आपल्या बाजूला बसले होते. जणू काय सत्ता आपल्याभोवती होती आणि तुम्ही शांत चित्ताने ‘अजी हे घडलेचि नाही...’ अशा पद्धतीने त्यावेळी आपली बैठक होती. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आपल्या चेहर्‍यावर समोर बसलेली माऊली वाचत होती.
भाईजी, खरं पाहिलं तर तुम्ही महाराष्ट्राचे भूषण आहात, तुम्हाला राज्य सरकारने महाराष्ट्रभूषण देऊन गौरविले पाहिजे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे तुम्हाला किमान पद्मविभूषणसाठी शिफारस केली पाहिजे. हे माझ्या मनात आले, लोकांच्या मनातही ते असेल, फक्त कार्यक्रमाला उपस्थित मंत्र्यांच्या मनात हा विचार असेल की नाही हे कोणालाच सांगता येणार नाही. शेवटी ते राजकारणी आहेत. त्यांच्या मनातलं प्रख्यात ज्योतिषी सांगू शकत नाही. परंतु सध्यातरी तुम्ही लोकांच्या मनातले ‘महाराष्ट्रभूषण’ आहात, हे काय कमी आहे? 
भाईजी, आपल्या अनेक भावी उपक्रमांना शुभेच्छा देऊन माझा पत्र प्रपंच आवरता घेतो.
कळावे, लोभ असावा, लोभ वाढवावा!!
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support