Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

‘नमस्कार महापौर कार्यालय’ उद्घोषणेचे जनक सेवानिवृत्त

 12 महापौरांचे स्वीयसहाय्यक राहिलेले अनिल दगडे यांना निरोप

ठाणे । वसंत चव्हाण
महापौर दालनात फोन केल्यावर ‘नमस्कार महापौर कार्यालय’ हा आवाज आता ऐकू येणार नाही. कारण महापौर दालनात गेल्या 34 वर्षांपासून कार्यरत असलेले आणि नमस्कार महापौर कार्यालय या घोषवाक्याची निर्मिती करणारे महापौरांचे स्वीयसहाय्यक अनिल दगडे बुधवारी सेवानिवृत्त झाले. तब्बल 12 हून अधिक महापौरांचा सहवास लाभलेले अनिल दगडे यांना बुधवारी ठाणे महापालिकेतून निरोप देण्यात आला. 
पुण्याच्या छोट्याशा खेड्यात 25 ऑक्टोबर 1960 रोजी सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या अनिल दगडे नोकरीच्या शोधात कल्याणात आले होते. त्यानंतर काही वर्षे त्यांनी ठाण्याच्या टेम्बी नाका परिसरात वास्तव्य केले. या काळात त्यांची ओळख शिवसेनेचे आनंद दिघे यांच्या झाली. आनंद दिघे यांनी अनिल दगडे यांना 1984 साली महापालिकेत नोकरी लावून दिली. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून त्यांना महापौरांच्या दालनात काम करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर आजवर जवळपास 12 महापौरांसोबत त्यांनी काम केले आहे. 
अनिल दगडे यांनी महापालिकेची अनेक विकासकामे होताना पहिले आहेत.एवढेच नव्हे तर प्रत्येक अधिकारी, पदाधिकारी तसेच नगरसेवकांचे दूरध्वनी क्रमांक त्यांच्या तोंडपाठ आहेत. महापौरांनी कोणालाही फोन करण्याचे आदेश दिल्यानंतर लगेचच डायरी नंबर न शोधता दगडे फोन लावत असत. त्यानंतर ‘नमस्कार महापौर कार्यालय’ हा आवाज ऐकून अनेकवेळा समोरून दगडे साहेब बोला असे उत्तर नेहमी यायचे. त्यामुळे नमस्कार महापौर कार्यालय या शब्दाचे खरे जनक दगडे असून त्यांनीच ह्या शब्दाची ओळख निर्माण केली असल्याचे महापौर कार्यलयात कर्मचार्‍यांनी सांगितले. 
महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमात तसेच सभागृहातील प्रत्येक निवडणुकीत त्यांनी भाग घेतला आहे. महापालिकेचा दांडगा अनुभव असलेल्या दगडे यांना संगीताची आवड असल्याने सेवानिवृत्तीनंतर संगीतात रमण्याचा निर्णय दगडे यांनी घेतला आहे. माऊथ ऑर्गन, गिटार, हार्मोनियम अशी वाद्य वाजवण्याची आवड दगडे यांना आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी वेळ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

धर्मवीर आनंद दिघे यांनी यांच्यामुळे मी यशस्वी झालो. आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेत नोकरी लावली. महापौर कार्यलयात काम करण्याचा आदेशही दिघे यांनी दिले. जिल्हाप्रमुख पदाधिकारी यांनी विश्वास दाखविला. विश्वास सार्थ करीत अनेक कामे केली. भविष्यात पालिकेच्या विविध कामासाठी विनामूल्य काम करीन. पुढे संगीत क्षेत्रात रमण्याचा निर्णय घेतला आहे. मला माऊथ ऑर्गन, गिटार, हार्मोनियम वाजवण्याची आवड आहे. त्यामुळे या कला मी यापुढे जोपासेन. - अनिल दगडे, सेवानिवृत्त कर्मचारी

महापौर झाल्यानतंर महापालिकेतील कोणतेही काम असो दगडे यांना सांगितल्यानंतर ते लगेच व्हायचे. अनेक वेळा कार्यालयातून फोन आल्यानंतर त्यांच्या आवाजाचा सूर कानात घुमत असतो. तब्बल 34 वर्ष महापालिकेची अविरत सेवा केल्याबद्दल दगडे यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. - मिनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे महापालिका
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support