Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

वेंगुर्ल्यात साकारतेय सुसज्ज मच्छिमार्केट

 मच्छिमार भगिनींना फायदा होणार असल्याचे पालकमंत्र्यांचे उद्गार

  सिंधुदुर्गनगरी । प्रतिनिधी
मच्छिमार समाजाच्या विकासासाठी सर्वते सहकार्य दिले जाईल. तसेच मच्छिमार भगिनींच्या सोयीसाठीच वेंगुर्ल्यात सुसज्ज असे मच्छिमार्केट उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी वेंगुर्ले नगरपरिषदच्या नवीन मच्छिमार्केटच्या भूमीपूजन समारंभावेळी केले.
यावेळी बंदर विकास व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, नगराध्यक्ष दिलीप गिरप उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार शंकरभाई कांबळी, माजी आमदार राजन तेली, पंचायत समिती सभापती श्री मोरजकर, पाणी पुरवठा समिती सभापती तुषास साबळे आदी मान्यवरांसह वेंगुर्लेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, केरवाडा, नवाबाग, निवती आणि आचरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. मच्छिमार वस्त्यांकडे जाणारे सर्व रस्ते व जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निधीची तरतूद यापूर्वीच केली असून लवकरच रस्त्यांचे कामही सुरू होणार आहे. वेंगुर्ला व नवाबाग यांना जोडणार्‍या पुलाचे काम रखडले होते. पण आता या पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन गस्ती नौका लवकरच येणार आहे. कोकणातील चार जिल्ह्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे चार गस्ती नौंकासाठी 34 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या गस्ती नौका आल्यानंतर परराज्यातील बोटींचा स्थानिकांना होणारा त्रास बंद होईल, असा विश्वास आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी वेंगुर्ल्यात बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी येणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
वेंगुर्लावासियांचे अनेक वर्षांचे सुसज्ज मच्छिमार्केटचे  स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे सांगून बंदर विकास व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच मच्छिमार्केटचे काम मार्गी लागले आहे. मासे खवय्यांच्या या गावात सुसज्ज असे नवीन मच्छिमार्केट होत आहे. हे मच्छिमार्केट साकारल्यानंतर ते शहराचे वैभव असेल. या कामासाठीच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी सर्व वेंगुर्लेवासियांनी या कामावर देखरेख करावी, सहा महिन्यात ही वास्तू उभी राहील. विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा मच्छिमार्केच्या पायाभरणीचा समारंभ आहे. त्यामुळेच सर्वांनी विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support