Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

तेजाची आरती

दिवाळीचे निमित्त घेऊन यंदासुद्धा जिकडेतिकडे दिवाळी पहाट होणार आहे. ज्या त्रयींनी महाराष्ट्राला समृद्ध केले ते पु ल देशपांडे, ग दि माडगूळकर, सुधीर फडके यांचा संगीतमय प्रवास इथे उलगडणार आहे.

दिवाळी ही काही आजची नाही, पूर्वापार चालत आलेली आहे. परंतु पन्नास वर्षांपूर्वीची दिवाळी लक्षात घेता आज दिवाळीचे जे स्वरुप आहे याची किंचीतही कल्पना येणार नाही. भल्या पहाटे उठायचे, अभ्यंगस्नान करुन, रांगोळी काढून परिसर दिवारोषनाईने सजवायचा, प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे फटाके फोडायचे, घरात तयार केलेल्या फराळाचा यथेच्छ आनंद घ्यायचा, नातेवाईक, स्नेहीमंडळी यांना फराळ द्यायचा असे काहीसे स्वरुप त्यावेळी होते आणि ते कितीतरी वर्षे चालतही राहिले. घराची साफसफाई, नवीन कपड्यांचे आकर्षण, दागिने खरेदी या गोष्टी पुढे माणसाच्या खर्चाप्रमाणे दिवाळीत आल्या. आता मात्र त्याचे स्वरुप पूर्णपणे बदललेले आहे. एकत्रित आनंद म्हणून सार्वजनिक उत्सव मंडळाचे महत्त्व वाढले. जेवढे दिवस दिवाळी तेवढे दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. काही उत्सव मंडळांमध्ये लक्ष्मी देवीची स्थापना केली जाते. अशा रचनेतही कितीतरी वर्षे गेलेली आहेत. भारतीय सणांचा विचार केला तर दिवाळी हा सर्वांत मोठा सण मानला जातो. तो आपल्या घरातच साजरा व्हावा अशी काहीशी परंपरेने आलेल्या कुटुंबाची धारणा होती. त्यामुळे भल्या पहाटे दिवाळीचा हा आनंद सोडून अन्य कोठेतरी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेणे ही संकल्पनाच मूळात न पटणारी आहे. परंतु एका संस्थेने केवळ एक प्रयत्न म्हणून दिवाळी पहाट अर्थात संगीताची मैफिल असे काहीसे कार्यक्रमाचे स्वरुप ठरवले आणि कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या संस्थांनी आवाक व्हावे असा प्रतिसाद या पहिल्या उपक्रमाला मिळाला. ‘चतुरंग’ या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला होता. सकाळी सहा वाजता तुडुंब भरलेल्या हॉलमध्ये ही दिवाळी साजरी झाली होती. चतुरंगने ही प्रथा पुढे चालू ठेवली, उलट प्रत्येकवर्षी त्याला उत्तम प्रतिसादही लाभला. या गोष्टीला आता दोन दशकांची कालावधी गेलेली आहे. या दोन दशकात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला आहे की मुंबई आणि मुंबईलगतच्या सर्वच शहरात दिवाळी पहाट हा उपक्रम जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. प्रेक्षक आवर्जून अशा कार्यक्रमांना वेळ देत आहे म्हंटल्यानंतर महाराष्ट्राच्या अन्य शहरातही ही दिवाळी पहाट मोठ्या दिमाखात होताना दिसते. इतरवेळी येवढ्या सकाळी कार्यक्रम करायचा म्हणजे व्यावसायिक कलाकार विशेष करुन गायक कलाकार नाक मुरडत होते. आता हेही कलाकार अशा कार्यक्रमात सहभाग असावा म्हणून प्रयत्न करायला लागलेले आहेत. गाणी, नृत्य, गप्पाटप्पा, नाट्यप्रवेश, मुलाखत हा जरी या दिवाळी पहाटचा मुख्य साचा असला तरी प्रत्येकाचे खास असे वैशिष्ट्य राहिलेले आहे. सत्कार समारंभ, गुणीजणांना पुरस्कार हा विचार प्रामुख्याने पुढे यायला लागलेला आहे. 2018 दिवाळी पहाटचे यंदा वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू साहित्यिक पु ल देशपांडे, कवी, गीतकार ग दि माडगूळकर आणि गायक, संगीतकार सुधीर फडके या त्रिमूर्तींची यंदा जन्मशताब्दी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनापासून बर्‍याचशा आयोजकांनी एका शतकाचा सुरेल प्रवास या निमित्ताने घडविण्याचे ठरवलेले आहे. थोडक्यात काय तर यंदा दिवाळी पहाट ही पु लंच्या किश्श्यांनी, गदिमांच्या गीतांनी आणि बाबूजींच्या सुरेल संगीताने लकाकणार आहे. विनोद पवार हे गेली पंधरा वर्षे ‘गगन सदन तेजोमय’ हा कार्यक्रम करत आलेले आहेत. 7 नोव्हेंबरची पहाट ही त्रिगुणात्मक, त्रिज्योतीची अखंड उज्ज्वल कीर्ती हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असणार आहे. रविंद्र नाट्यमंदिर येथे पहाटे 6.45 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नाट्य, चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रतीवर्षाप्रमाणे यंदासुद्धा सागर रेड्डी, एकता निराधार संस्था, अनघा मोडक, योगिता तांबे यांचा ‘ध्यास’ पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. डॉ. दीपक सावंत यांनी ‘जीवनगाणी’च्या सहकार्याने 6 नोव्हेंबरला दीनानाथ नाट्यगृह येथे दिवाळी पहाटचे आयोजन केलेले आहे. यंदा या संस्थेचे अकरावे वर्ष आहे. सकाळी 6 वाजता होणार्‍या या सुरेल कार्यक्रमाला उत्तरा केळकर, श्रीकांत नारायण यांच्याबरोबर अनेक गायकांचा सहभाग असणार आहे. खमंग, खुसखुशीत गाण्यांचा श्रवणीय फराळ असे काहीसे त्याचे स्वरुप असणार आहे. महेश काळे हेसुद्धा 8 नोव्हेंबरची पहाट सुरेल करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ठाण्यातल्या श्री समर्थ शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. दिगंबर प्रभू या निर्मात्यानेसुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे यंदासुद्धा दिवाळी खास करण्याचे ठरवलेले आहे. ‘दिवाळी’, ‘शरदाचे चांदणे’ असे दोन कार्यक्रम सलग चार दिवस करण्याचे ठरवलेले आहे. शरदाचे चांदणे या कार्यक्रमात शरद पोंक्षे अभिनेता, दिग्दर्शक म्हणून तर शरद उपध्ये राशिचक्रकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिपाली केळकर हीच्या सूत्रसंचलनात गायक कलाकार गाणीही सादर करणार आहेत. दिवाळी या कार्यक्रमात अलका कुबल, हर्षदा खानविलकर या  किस्से सांगण्यासाठी सहभागी होणार आहेत. अतुल अरुण दाते यानेसुद्धा 6 नोव्हेंबरची पहाट खास करण्याची तयारी केलेली आहे. ठाण्याच्या काशिनाथ सभागृहात पु ल, ग दि मा, बाबूजी यांचा सुरेल प्रवास घडविला जाणार आहे. हाही कार्यक्रम 6.30 ला होणार आहे. ज्योतीने तेजाची आरती, त्रिमूर्ती साठवण आठवण, गुण गायीन आवडी, शब्दसुरांचे त्रिदेव या शिर्षकात दिवाळी पहाट हा कार्यक्रम केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमात पु ल, ग दि मा, बाबूजी यांचा संगीतमय प्रवास अधोरेखित केला जाणार आहे. अशोक तोडणकर, सचिन पाताडे यांनी पुढाकार घेऊन ‘गीतमाला’ या शिर्षकात दिवाळी पहाट सुरेल करण्याचे ठरवलेले आहे. 6 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता दहिसर पश्चिम इथल्या यशवंत तावडे चौकात हा कार्यक्रम होणार आहे. 1960 ते 2018 असा मराठी चित्रपट संगीताचा प्रवास ‘चित्ररंग’ या कार्यक्रमातून घडविला जाणार आहे. 7 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात या सुरेल संगीताचा आनंद घेता येईल. संदीप कोकीळ हे या कार्यक्रमाचे निवेदक आहेत. अक्षदा विचारे हिने ‘जोडी तुझी माझी’ या शिर्षकात दिवाळी पहाट मंगलमयी करण्याचे ठरवलेले आहे. 7 नोव्हेंबर, सकाळी 7.30 वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. सूरप्रभात हा कार्यक्रम नरिमन पाँईंटच्या चव्हाण सेंटरमधे 6 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता होणार आहे. रेखा नार्वेकर याचे सूत्रसंचलन करतील. अपूर्वा गोखले, कैवल्य कुमार गुरव यांचा यात सहभाग आहे.    
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support