Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

भिवंडी पालिकेच्या वतीने अभय योजना सुरू करण्याची मागणी

  

भिवंडी । प्रतिनिधी
महानगरपालिकेने बंद केलेली अभय योजना सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांसाठी सोईची असणारी अभय योजना सुरु करावी अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांनी आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे केली आहे. येत्या आठ दिवसांत योजना सुरू न केल्यास मनपा प्रशासनाच्या विरोधात  हल्ला बोल  मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
भिवंडी पालिका क्षेत्रातील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी कर नियमित भरले जात नसल्याने  महापालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे. या आर्थिक संकटातून महापालिकेला सावरण्यासाठी व मालमत्ता धारकांनी थकीत कर लवकरात लवकर भरावे यासाठी पालिका प्रशासनाने मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या सुविधेसाठी  अभय योजना  सुरु केली आहे. या अभय योजनेच्या माध्यमातून शहरातील स्थानिक रहिवाशांना थकीत घरपट्टी व पाणीपट्टीवर पालिका प्रशासनाकडून आकारण्यात आलेले व्याज 100 टक्के माफ केला जात होते. या योजनेमुळे मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात थकीत कर भरला होता ज्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अधिक रक्कम जमा होण्यास मदत झाली होती.  
भिवंडी शहरातील अनेक यंत्रमाग उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट पसरले आहे. त्यातच आता प्रशासनाने अभय योजना  बंद करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे नागररिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. 
अभय योजनेमुळे वर्षानूवर्षे मालमत्ता कर न भरणार्‍या थकीत मालमत्ता धारकांनी देखील आपले कर भरले आहेत.त्यामुळे पालिका प्रशासनास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदाही झाला आहे. कल्याण डोंबिवली मनपा ही योजणा सुरू आहे मात्र भिवंडीत अचानक ही अभय योजना मनपा प्रशासनाने  बंद का केली ? असा सवाल नागरिकांना पडला आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support