This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

नवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास

एकनाथ शिंदे यांनी लावले मार्गी
:नवीन ठाणे, नवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास,anokha,facebook,immiserizing

 हे प्रकल्प लागले मार्गी

ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेला कोस्टल रोड, श्रीनगर ते गायमुख फुट हिल रोड,शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प, एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागेवर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,पार्किंग सह अन्य सार्वजनिक सुविधा, नवीन ठाण्याचा विकास अशा विविध प्रकल्पांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
पीडब्ल्यूडी, झेडपी, महापालिका यांची एकत्रित कार्यालये
तलावपाळी जवळील पीडब्ल्यूडी, झेडपी,महापालिका यांच्या जुन्या वास्तूंचा पुनर्विकास करून पार्किंग सुविधेसह संयुक्त संकुल उभारण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई। प्र्रतिनिधी
नवीन ठाण्याचा विकास, शहरातील मेट्रो व्यवस्था, कोस्टल रोड अशा ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावले असून, गुरुवारी या प्रकल्पांना राज्य शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी संबंधित यंत्रणांना या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
कोस्टल रोडला तत्वत: मंजूरी देऊन डीपीआर तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले असून जमिनीची उपलब्धता तपासण्याचे आदेशही देण्यात आले. गायमुख ते खारबाव या खाडीपुलाचे काम एमएसारडीसी करणार असून डीपीआर तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.
ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा, नव्या कारागृहाचे विकास आराखडे यांना अपर महानिरीक्षक, तुरुंग यांची मंजुरी घेण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला देण्यात आले. शहरांतर्गत मेट्रोसाठी
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून महापालिकेने डीपीआर तयार करून शासनाला मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे, कल्याण-ठाणे-वसई या जलवाहतुकीचा 650 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा आराखडा ठाणे महापालिकेने केला असून त्यातील 100 कोटींच्या टप्प्याचे काम जेएनपीटीने महापालिकेच्या सल्ल्याने त्वरित सुरू करण्याचा निर्णयही गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.
एसटी महामंडळाच्या कळवा येथील अतिरिक्त जागेवर सुपर स्पेशालिटी बांधण्याबाबतचा प्रस्ताव सविस्तर आरखड्यासह मंजुरीसाठी परिवहन विभागाला पाठवण्याचे निर्देश बैठकीत महापालिकेला देण्यात आले. त्याचप्रमाणे, ठाणे स्थानकाबाहेर असलेल्या एसटी स्टँडच्या अतिरिक्त जागेवर पार्किंग आणि अन्य सार्वजनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहे.
डायघर येथील प्रस्तावित एज्युकेशन हबलाही लवकरच मंजुरी अपेक्षित असून दिवा-आगासन रस्त्याचा डीपीआर सादर करण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले. कळवा-खारेगाव लिंक रोडचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
Tags:नवीन ठाणे, नवीन ठाणे, मेट्रो, कोस्टल रोड विकास,anokha,facebook,immiserizing
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support