This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

ऑनलाईन शॉपिंगविरोधात उल्हासनगर व्यापारांची चाणक्यनिती

उल्हासनगरात कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय रद्द करण्याची वेळ

 उल्हासनगर । प्रतिनिधी
व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगर शहरातील व्यापारी हे ऑनलाइन खरेदीबाबाबत एकवटले आहेत. ऑनलाइन बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय स्विकारत, वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत स्विकारू नका, अशी चाणक्यनिती अवलंबण्याचे आवाहन उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या व्यापार्‍यांनी केले आहे. 
उल्हासनगर शहरात 25 हजार व्यापारी आहेत. विविध वस्तू विक्री करणारे 48 बाजार आहेत. हे 48 बाजार उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या अंतर्गत येतात. या सर्व व्यापार्‍यांची करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा दिवाळी सणात बाजार थंड आहे. दिवाळी सणानिमित्त होणारी खरेदीची लगबग दिसेनाशी झाली आहे. उल्हासनगर शहरातील व्यापार आणि उद्योगधंद्यांना उतरती कळा लागण्यामागे होणारी ऑनलाईन खरेदी असल्याने व्यापार हताश झाले आहेत. 
या व्यापार्‍यांच्या उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या संघटनेने मंगळवारी दुपारी कॅम्प 3 येथील रिजेन्सी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर मीना आयलानी, टिओके प्रमुख ओमी कलानी, युटीएचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष पितु राजवानी, दिपक छतलानी, राम तनवाणी, दिनेश लेहरानी, इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल असोसिएशनचे व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी भागातील व्यापारी संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. 
ह्या बैठकीत ऑनलाईन व्यापाराचा निषेध केला जात असताना उल्हासनगरच्या व्यापार्‍यांच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी वेब पोर्टल आणणार असल्याचे टिओके प्रमुख ओमी कलानी यांनी सांगितले. यामुळे ही बैठक ऑनलाईन खरेदीच्या विरोधात बोलावली आहे कीपाठिंबा देण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर न मिळालेले व्यापारी माघारी परतले. 

अशी आहे चाणक्यनिती! 
मागील आठवड्याभरापासून उल्हासनगरातील व्यापार्‍यांनी बड्या ऑनलाईन विक्री करणार्‍या कंपनीचे महागडे टिव्ही, फ्रिजची ऑनलाईन मागणी बड्या कंपनीच्या अ‍ॅपवर करण्यास सुरुवात केली आहे. ही मागणी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारला जातो. ज्यावेळी ही महागडी वस्तू कुरिअर मार्फत घरी आल्यावर आज पैसे नाहीत, अउद्या या असे सांगून परत पाठवली जाते. पुन्हा दुसर्‍या दिवशी वस्तू आल्यावर असाच प्रकार केला जातो. यामुळे वस्तूच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने अखेर कंपनीचे ऑर्डर रद्द करते. असा प्रकार झाल्यामुळे अ‍ॅमेझॉन ह्या कंपनीने कॅश व डिलिव्हरी हा विकल्प उल्हासनगरच्या 421003 ह्या पिनकोडसाठी बंद केल्याचे छतलानी यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support