This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Sunday, November 4, 2018

पेण-पनवेल-दिवा लोकल रखडली, उद्घाटन सोहळा रद्द

पेण । पेण रेल्वे स्थानकामधून रविवारी दिवाळीच्या मुहूर्तावर सुटणार्‍या पेण-पनवेल-दिवा लोकल गाड्यांच्या उद्घाटन सोहळ्याला रेड सिग्नल मिळाला असून हा उद्घाटन सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळा रद्द करण्याचे कारण रेल्वे प्रशासनाने दिले नसले तरी राजकीय श्रेय मिळण्याच्या वादात पेणची रेल्वे अडकली असून त्याच कारणाने रविवारचा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याची चर्चा पेणमध्ये सुरू झाली आहे.

पेण रेल्वे स्थानकमधून मुंबईच्या दिशेने जादा लोकल गाड्या सोडण्यात याव्यात, हॉलिडे ट्रेन थांबविण्यात याव्यात, पेण रेल्वे स्थानकामधून परतीचे आरक्षण तिकीट मिळावे, दोन फलाटांना जोडणारा पूल करण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून स्नेहबंध गट, मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना व पेणमधील विविध सामाजिक संघटना यांनी लढा उभारला होता. या लढ्याला यश येऊन गणेशोत्सव काळात हॉलिडे स्पेशल गाड्यांना थांबा देण्यात आला होता. तसेच पेण स्थानकामधून पेण ते दिवा अशी सकाळी 7.30 वाजताची गाडी व दुपारी 1.30 वाजताची पेण ते पनवेल - दिवा - बोईसर अशा दोन जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे 1 नोव्हेंबर ला सोशल मीडियावर मेसेजद्वारे जाहीर करण्यात आले होते.

रेल्वे प्रशासनाने पेणकरांच्या मूलभूत प्रवासी मानवी अधिकारांचा अपमान करुन दिवाळीच्या मुहूर्तावर क्रूर चेष्टा केली आहे. काहीही कारण असले तरी जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील.  
मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती
----
कुठलेही अधिकृत पत्र आलेले नसताना व रेल्वेने जाहीर केलेले नसताना श्रेयासाठी राजकीय पक्ष व शाश्वत समितीने सोशल मीडियावर उद्घाटनाचे मेसेज फिरवून पेणकरांची क्रूर चेष्ठा केली. 
सचिन पवार, रेल्वे प्रवाशी

----
Tags: pen panvel rail, pen panvel diva train timing, pen panvel diva local stopped

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support