Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत क्षत्रिय वेखंडे चमकला

ठाणे । प्रतिनिधी 
चेस गुरु अकादमीच्या 8 वर्ष 10 महिने वय असलेल्या क्षत्रिय वेखंडेने नुकत्याच गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. खुल्या वयोगटाच्या या स्पर्धेत क्षत्रियने राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील 14 वर्ष गटाचा विजेता कार्तिक साईला बरोबरीत रोखत सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. यंदाच्या हंगामात क्षत्रियने आपल्या वयाच्या मोठया गटात पहिल्या पाचात स्थान मिळवले आहे. 
क्षत्रियचा अनुक्रमे 9, 11 आणि 13 वर्षाखालील गटामधील आघाडीच्या पाच खेळाडूंमध्ये समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धामध्ये लक्षवेधक कामगिरी करणार्‍या क्षत्रियला सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे फिडे 1574 इतके गुणांकन मिळाले आहे. क्षत्रियच्या खेळाबद्दल बोलताना त्याचे प्रशिक्षक अमित पांचाळ म्हणाले,  क्षत्रियने वयाच्या 5 व्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. त्याला या खेळाची खूप समज असून  पटावर असलेली मोहर्‍यांची स्थिती पाहून तो ऐन सामन्यात आपल्या रणनितीत बदल करतो. त्याच्या या खेळामुळे त्याचे प्रतिस्पर्धी नेहमीच अडचणीत येतात. क्षत्रिय असाच खेळत राहिला तर भारताला आणि महाराष्ट्राला आणखी एक वयाने लहान असलेला ग्रँडमास्टर मिळू शकतो.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support