This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

घाबरलेल्या लोकांची पळापळ, अनेक जण जखमी

दारू पाजल्यामुळे औरंगाबादच्या बाजारात रेड्याचा राडा

औरंगाबाद । प्रतिनिधी
दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत असतानाच मंगळवारी रात्री मस्तावलेल्या रेड्याने धुमाकूळ घातल्याने अनेकांची धांदल उडाली. काही युवकांनी त्याच्या पाठीमागे वाहने पळविल्याने तो अधिकच बिथरला. रेडा अचानक हल्ला करेल या भीतीने नागरिकांची धावपळ उडाली होती. यात काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. 
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. त्यातच मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास नागरिक खरेदीत मग्न असताना गुलमंडी येथे अचानक एक रेडा आला. यामुळे घाबरलेले लोक आरडाओरड करू लागले. अनेक जण दुकानात शिरले, तर काही जण जिथे उंच ओट्यावर जागा दिसेल तिथे जाऊन उभे राहिले. या यामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला होता. कोणी तरी रेड्याला दारू पाजल्यामुळे तो गुलमंडी, दिवाणदेवडी, केळीबाजार, सिटीचौक, मछलीखडक या मार्गावर सैरावैरा पळत होता.
अवघ्या एक तासात त्याने या परिसराला 4 फेर्‍या मारल्या. 10 ते 15 दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करीत होते. ‘हटो हटो’ असे म्हणत ते लोकांना सावध करीत होते. मात्र, त्यांच्या ओरडण्याने व पाठलाग करीत असल्याने रेडा अधिकच बिथरला होता. तो आणखी वेगाने रस्त्यावरून धावत होता. यात काही नागरिक रस्त्यावर पडले. मात्र, किती जण जखमी झाले, याची माहिती मिळू शकली नाही. 
यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याबाबत प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, या रेड्याच्या पाठीमागे युवक दुचाकी घेऊन लागले होते. यामुळे तो बिथरला होता. युवक त्याच्या पाठीमागे लागले नसते तर तो कुठे तरी एका जागेवर थांबला असता. या हेल्याचा मालक कोण आहे, हे कळू शकले नाही. मुख्य बाजारपेठेत हेला रात्री धुमाकूळ घालत असताना पोलीस मात्र, दिसून आले नाही, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support