Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

ठाणे जिल्हा हादरला, वडिलांच्या दुकानातील कामगारांचे कृत्य

5 लाखांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या 

 भिवंडी । प्र्रतिनिधी
पाच लाखांच्या खंडणीसाठी कुरेशी नगर, निजामपुरा येथे राहणार्‍या मटण विक्रेत्याच्या 14 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून व गळा आवळून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्हा हादरला आहे. बिलाल शकिल कुरेशी असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.  तो 28 ऑक्टोबरपासून घरातू बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवली गावाच्या हद्दीत पाईपलाईनच्या अडगळीत आढळून आला. बिलालच्या वडिलांच्या दुकानात काम करणार्‍या दोन कामगारांनी साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. यातील वाहिद अन्सारी (20) याच्या मुसक्या भिवंडी पोलिसांनी आवळल्या असून दुसरा अल्पवयीन आरोपी कुटुंबासह शहरातून पसार झाला आहे.
बिलाल कुरेशी हा 28 ऑक्टोबर रोजी विठ्ठल नगर येथील वडिलांच्या बिफ दुकानात गेला होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले होते. अपहरण करणार्‍यांनी बिलालच्या वडिलांकडे 5 लाखांची खंडणी मागितली होती.
तसेच पोलिसांत तक्रार केल्यास मुलगा जिवंत मिळणार नाही, अशी धमकी  अपहरण कर्त्याने फोनवर दिली होती. मात्र कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार केली होती. मात्र शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गालगत ओवली गावाच्या हद्दीत पाईपलाईनच्या अडगळीत बिलालचा मृतदेह आढळून आला. 
28 ऑक्टोबर रोजी अपहरण झालेल्या बिलाल वडिलांच्या बीफच्या दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला. तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत मुलगा न मिळाल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. कुटुंब तक्रार देण्यासाठी जाणार इतक्यात अपहरणकर्त्यांचा फोन आला व त्याने मुलाला जिवंत सोडण्यासाठी 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकीही दिली होती.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support