Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

धनत्रयोदशी


आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरितातूसमुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
धनतेरसाची कथा.....कार्तिक कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथिला धनतेरस पर्व पूरर्ण श्रद्धेने व विश्वासाने साजरी केली जाते. धनवन्तरी बरोबर देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते धनतेरसच्या दिवशी कुबेरा बरोबर यमदेवाची ही पुजा करुन दीपदान केले जाते. यमदेवाची पूजा केल्याने आपल्या घरात अपमृत्यूचे भय रहात नाही.
पूजा केल्यानंतर घराच्या मुख्य द्वारावर दक्षिण दिशेला दिवा ठेवून त्यात काही पैसे व एक कवडी टाकून तो दिवा पेटवावा.
धनतेरसच्या दिवशी कुबेराला प्रसन्न करण्याचा मंत्र-
शुभ मुहूर्तावर धनतेरसच्या दिवशी धूप, दीप, नैवैद्ध पूजन झाल्यावर खालील मंत्राचा जप करावा:-यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये धन-धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा॥ हा मंत्र जप 108 वेळा करावा. 
धनतेरसच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त-
प्रदोष काळात असतो. शास्त्रों नुसार, सूर्यास्ता नंतर 2 तास 24 मिनट पर्यत प्रदोषकाळ असतो. या काळात दीपदान व लक्ष्मी पूजन करणे अति शुभ मानले आहे.कायम स्वरूपी लक्ष्मी प्राप्ति होते.
* धनतेरसला धनाला महत्त्व का दिले जाते?
* धनतेरसात धन शब्दाचा काय अर्थ आहे? 
याचे उत्तर म्हणजे
कार्तिक कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथिच्या दिवशी धन्वन्तरीचा जन्म झाला होता. म्हणून या तिथीस धनतेरस या नावाने ओळखले जाते.
जर धन नाही तर मग धनतेरसचे काय महत्त्व आहे?
उत्तर:-देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे.
परन्तु मातेची कृपा प्राप्त करुन घेण्यासाठी आपले स्वस्थ्य आणि चांगले आयुष्य पाहिजे.
आजच्या दिवशी काही नवीन खरेदी करण्याची परंपरा का आहे?
उत्तर:-समुद्र मंथनाच्या वेळ धन्वन्तरी कलशात अमृत घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवशी नवीन भांडे खरेदी करण्याची प्रथा आहे.तसेच चांदी ही खरेदी करावी.
बाजारी करण आणि धनाच्या प्रति आपणास आकर्षण आहे.त्यामुळे आपणास अंध बनवले आहे.आणि आपण गर्दीच्या मागे चालून काहीही खरेदी करतो.
या दिवशी चांदी खरेदी करण्याची प्रथा का आहे?
उत्तर: याच्या मागचे कारण म्हणजे चांदी ही चंद्राचे प्रतीक आहे. जी शितलता प्रदान करते आणि मनात समाधान रूपी धनाचा वास राहतो.समाधान हे सर्वात मोठे धन म्हटले आहे.ज्याच्या जवळ समाधानाचे धन आहे तो सर्वात मोठा धनवान आहे.
भगवान धन्वन्तरी हे आरोग्याची देवता आहे.त्याच्या पासून स्वास्थ्य आणि आरोग्य प्राप्त होते.
- लेखक आध्यात्मिक लेखक व मार्गदर्शक आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support