This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

कल्याणमधील विहिर दुर्घटना विषारी वायूमुळेच आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज


भिवंडी । प्रतिनिधी 
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात घडलेली दुर्घटना ही विहिरीतील विषारी वायूमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ही विहीर साफ करताना त्यातून हा वायू बाहेर पडला आणि ही भयंकर दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुरुवारी घडलेल्या या घटनेमध्ये तीन नागरिकांबरोबरच अग्निशमन दलाच्या 2 जवानांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनेला नेमके जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. तर या दुर्दैवी घटनेनंतर पाचही जणांचे रुख्मिणीबाई रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर विहिरीतील वायूमुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.डी. लवंगारे यांनी व्यक्त केला. तसेच या सर्वांचे व्हिसेरा आणि रक्ताचे नमुनेही राखून ठेवण्यात आले असून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. 
या विहिरीच्या बाजूने जाणार्‍या नाल्यातील सांडपाणी विहिरीत जात असून या विहिरीच्या मागील बाजूस 300 मीटर अंतरावर तीन कारखाने आहेत. या कारखान्यात गंधक आणि इतर रासायनिक केमिकल तयार होत असून हे केमिकल देखील नाल्यातून वाहत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाणी हलल्यामुळे घातक वायूच्या दुर्गंधीने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या विहिरीतील गाळ अजूनही कायम असून शुक्रवारी दुपारी या विहिरीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे विहिरीतील पाणी हलल्याने आतील घातक वायूची दुर्गंधी परिसरात पसरली. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी तत्काळ महापालिका, अग्निशमन आणि पोलिसांना याची माहिती दिली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support