Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

कल्याणात विद्यार्थ्यांची व्यापार पेठ

कंदील, पणतीचे उत्पादन करून विक्री

गावातील नागरिकांनीही हौसेने आणि कुतुहलाने या वस्तू खरेदी केल्या. व्यवसाय सुरू करतांना भागभांडवल गुंतवणूक करावी लागते आणि विक्री करतांना नफा तसेच ग्राहकांचा आनंद व समाधान जपावे लागते याचा वस्तू पाठ या निमित्ताने मुलांना मिळाल्याचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले.
कल्याण । प्रतिनिधी
पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाची सांगड शालेय जीवनात मुलांना घालता आली पाहिजे. समाजात वावरताना हुशारीने आणि प्रामाणिकपणे राहता आले पाहिजे. यासाठी पिसवली शाळेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम मुलांसाठी राबवले जातात. शालेय जीवनातच मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळायला हवा, व्यवहार ज्ञान जागृत व्हायला हवे, वस्तू अत्यंत आकर्षकपणे तयार करून त्यांची विक्री करता आली पाहिजे. या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा पिसवली, कल्याण  येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून वस्तू उत्पादन व विक्री हा उपक्रम घेण्यात आला. 
या उपक्रमाची संकल्पना सरीता काळे, स्मिता धबडे व सविता नवले या शिक्षकांची आहे. यासाठी बाजारातून मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या विकत आणून त्या मुलांनी रंगवल्या. त्यांना टिकल्या, मनी लावून अत्यंत आकर्षक अशा पणत्या तयार करण्यात आल्या. इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांनी आनंदाने हे काम केले. वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या मुलांनी मन लावून आकर्षक केल्या. त्याच वेळी अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने रंगीबेरंगी आकाश कंदील बनवले.
बाजारातून उटण्याचे साहित्य आणून सुगंधी उटणे तयार केले. रंगीत आकर्षक पणत्या, आकाश कंदील व सुगंधी उटणे मुलांनी गावात बाजार लावून, हातगाडीवर तसेच घरोघरी जाऊन विक्री केले. नवनिर्मिती, आकर्षकपणा तसेच व्यवहार ज्ञानाची जोड या उपक्रमातून घालण्याचा प्रयत्न केला गेला. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support