This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

खरेदीच्या उत्साहावर महागाईचे सावट

पेणमध्ये कंदील, पणत्यांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ
साध्या पणत्या 20 रुपये, तर आकर्षक पणत्या 150 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते राजूकुमार यांनी सांगितले. कासव, तसेच मासा पणती, कंदील लाइटची किंमत प्रत्येकी 100रुपयांच्या घरात आहे. गाय वासरूची मूर्ती 120 रुपयाला तर रेडिमेड किल्लेही विक्रीस आले असून, सोबतीला लहान आकाराचे सैनिकांच्या मूर्ती आहेत. 
प्रकाशाचा उत्सव असलेला दीपावली सण जवळ आला आहे. पारंपरिक आणि काही नवे प्रकारातील आकर्षक आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट यांसह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाश कंदील यंदा बाजारात आहेत. कासव, मासा पणती, कंदील लाईटसह आकर्षक डिझाईनच्या पणत्यांना चांगली मागणी वाढली आहे..
पेण । देवा पेरवी
दिवाळी सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहेत. हे आकर्षक आकाश कंदील लक्ष वेधून घेत असून यंदा आकाश कंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकार वडखळ, पेण बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यात यंदाही दिवाळीच्या सजावटी साहित्याच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे.
दिवाळी सण अधिक खुलतो पणत्या आणि मातीच्या दिव्यांमुळे. देवघरापासून ते अंगणापर्यंत सर्व परिसरात पणत्या लावण्याची प्रथा पाळली जाते. 
शहरातील विविध बाजारात जागोजागी असे विविध प्रकारचे आकर्षक दिवे विक्रीस दिसून येतात. यामध्ये पाच पणती, डबल प्लेट पणती, कोलकाता पणती, कासव, मासा पणती, चायना मेड पणती अशा वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या पणत्या विक्रीस बाजारात आल्या आहेत..
दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टिकर बाजारात आले आहेत. यात शुभलाभ, स्वतिक, पावले, श्री, ऊँ आणि इतर सजावट साहित्यांचा समावेश आहे. यात कागदी, प्लास्टिक, पीव्हिसी, मेटालिक, अक्रॉलिक अशा अनेक प्रकारात दाखल असून, त्याच बरोबर रांगोळीचे लहान-मोठ्या आकारातील स्टिकर बाजारात आले आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support