Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

नवीन मालिका वर्तुळ

झी युवाने सर्वस्तरातील प्रेक्षकांना सामावून घेण्याच्यादृष्टीने वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांसाठी सादर केलेल्या आहेत. त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. मालिकेची लांबी फारशी न वाढवता आटोपशीर कथा सादर करणे हा त्यांचा प्रामुख्याने हेतु आहे. आता भरपूर मनोरंजन करणारी मिनाक्षी आणि अभिजित परांजपे यांचे नाते प्रस्थापीत करणारी नवी मालिका ‘वर्तुळ’ ही मालिका लवकरच दाखवणे सुरु करणार आहे. 19 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता ही मालिका झी युवा वाहिनीवर दाखवण्याचे निश्चित झालेले आहे. मिनाक्षीचा भूतकाळ नक्की काय आहे हा या मालिकेचा मुख्य विषय आहे. अभिजित परांजपेची मुख्य व्यक्तीरेखा विकास पाटील हा अभिनेता साकार करणार आहे. मिनाक्षीच्या भूमिकेसाठी जुई या अभिनेत्रीची निवड झालेली आहे.

वय झाले म्हणून मजेदार जीवन जगणे थांबवायचे का असा प्रश्न ठरावीक वयानंतर माणसाला उद्भवतो. ‘लव यू जिंदगी’ नावाचा चित्रपट पुढल्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यात अनिरुद्ध दाते नावाचा माणूस आयुष्य आनंदाने जगण्याचा मंत्र देत आहे. हा अनिरुद्ध साकार करीत आहे, सचिन पिळगावकर. त्याच्याबरोबर प्रथमच मुख्य भूमिका निभावणार आहे प्रार्थना बेहेरे. एस पी प्रॉडक्शनची ही निर्मिती असून मनोज सावंत हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. कामाच्या व्यापामुळे अनिरुद्धला इच्छित तारुण्य काही जगता आले नाही, त्याची हुरहुर त्याला लागलेली आहे. आता संपत्ती आहे, स्थीरता आहे म्हणताना तारुण्य काय आहे हे आजमावण्यासाठी त्याची पुन्हा धडपड सुरु झालेली आहे. ‘लव यू जिंदगी’ मधे हा प्रवास उलगडताना दिसेल. हलकफुलक, सुंदर, प्रेमळ आयुष्य ही या चित्रपटाची कथा आहे. या दोघांशिवाय अनेक कलाकारांचा चित्रपटात सहभाग आहे. नवीन आशय, नवीन विषय या चित्रपटात असल्यामुळे सचिननेही तेवढीच तत्परता या चित्रपटाच्याबाबतीत दाखवलेली आहे. प्रार्थनाने नटखट व्यक्तीरेखा यात साकार केलेली आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support