Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, गावाला वळसा वाचणार

कोपरमधील प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट!
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, गावाला वळसा वाचणार
मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामालाही लवकरच सुरुवात सध्या कोपर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पूल नसल्याने पूर्वेला राहाणारे प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून ये-जा करतात. त्यामुळे मुंबई दिशेला पादचारी पुल व्हावा, यासाठीही पाठपुरावा सुरू होता. या पादचारी पुलालाही मंजुरी मिळून त्याचेही काम लवकरच सुरू होईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.
 ठाणे । प्रतिनिधी
जुन्या डोंबिवलीनजीक असलेले कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट मिळणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न व पाठपुराव्यामुळे कोपर हे शक्य झाले आहे. मंजुरी मिळालेल्या कोपर प्लॅटफॉर्मच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार 1 नोव्हेंबर रोजी पार पडले. याशिवाय अपर कोपरला जोडणार्‍या पादचारी पुलाच्या रुंदीकरणालाही मंजुरी मिळाली असून त्याचेही काम सुरू होणार आहे.
कल्याण, डोंबिवली, दिवा, कोपर आदी स्थानकांत उतरणार्‍या प्रवाशांच्या सुविधांसाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत. दिवा आणि ठाकुर्ली स्थानकांचा कायापालट त्यांच्याच पुढाकाराने झाला. अंबरनाथ स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे. कल्याण येथील रेल्वे यार्डाचे रिमॉडेलिंग होऊन लांब पल्ल्याच्या व उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन उपनगरी गाड्यांची संख्याही वाढणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा ते अंबरनाथपर्यंतच्या सर्व स्थानकांवर अवघ्या पाच रुपयांत पिण्याचे शुद्ध थंड पाणी उपलब्ध झाले आहे. अपघातग्रस्त प्रवाशांसाठी कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा येथे वैद्यकीय कक्ष सुरू झाले असून कळवा येथील वैद्यकीय कक्षही लवकरच सुरू होत आहे.
ठाकुर्ली येथे होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून त्यापाठोपाठ अंबरनाथ आणि कोपर स्थानकातही होम प्लॅटफॉर्मला मंजुरी मिळाली. कोपर स्थानकात भूमिपूजनानंतर कामालाही सुरुवात झाली असून या सोहळ्याप्रसंगी महापौर विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, सभागृह नेते श्रेयस समेळ, नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, संजय पावशे, तालुका प्रमुख एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support