Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, December 8, 2018

चोर म्हणून हिणवल्याने जाळल्या दुचाकी

ठाण्यातील जळीतकांडाचा लागला छडा
दोघांपैकी विजय जोशी याच्या विरोधात दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीने चोरीची तक्रार पोलिसात केली होती. तेव्हा पासून त्यास परिसरातील नागरिक चोर म्हणून हिणवत होते व याच रागातून त्याने सदर दुचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकल्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

 ठाणे । प्रतिनिधी
ठाण्यातील दुचाकी जळीतकांडाचा छडा अखेर पोलिसांनी लावला असून चोर म्हणून हिणवत असल्याचा बदला घेण्यासाठी दोघा शेजार्‍यांनीच या दुचाकी जाळल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी पहाटे गणेशवाडी सर्व्हिस रोडवर 9 दुचाकी अचानक पेटल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर, सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे नौपाडा पोलिसांनी अवघ्या 24 तासात विजय जोशी (22) व अनिकेत जाधव (19) या दोघांना अटक केली असून दोघांनीही या कृत्याची कबुली दिली आहे.
गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील गणेशवाडी सर्व्हिस रोडवर 9 दुचाकी अचानक पेटल्या होत्या. दरम्यान, एक दुचाकी जळत असताना या भागातील एका प्रत्यक्षदर्शी याच्या निदर्शनास आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान जवळच असलेल्या अग्निशमन दलातील जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे या भागात पार्क केलेल्या इतर चारचाकी आणि दुचाकी गाड्या या आगीपासून बचावल्या. मात्र या दुचाकी जळीत कांडाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी वेगवेगळी पथके निर्माण करून परिसरातील तब्बल 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. याच दरम्यान, एका सीसीटीव्हीत दोन तरुण संशयास्पदरित्या आढळून आले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support