Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, December 8, 2018

थकित मालमत्ताधारकांवर महापालिकेची धडक कारवाई

 ठाण्यात 882 मालमत्तांची जप्ती
थकित मालमत्ताधारकांवर महापालिकेची धडक कारवाई, ठाण्यात 882 मालमत्तांची जप्ती

ठाणे । प्रतिनिधी
ठाणे महापालिकेने मालमत्ता कर व पाणी कर वसुलीची मोहीम तीव्र केली असून देयके न भरणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतंर्गत 882 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करत 159 मालमत्ता सील करण्यात आल्या असून  98 नळसंयोजन खंडित करण्यात आले आहे. 
जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता व पाणी कराची थकबाकी रक्कम त्वरित करावी  असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.  सन 2018-19 या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेने प्रभागनिहाय कारवाई सुरू केली आहे. नागरिकांना मालमत्ता कर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून 31 मार्च, 2019 पर्यंत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (21 मार्च, 2019 वगळून) पूर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत   कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ता कराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल, उद्योग संकुलात मालमत्ता करवसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यात येईल. याकरिता प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधावा. महापालिकेच्या  www.thanecity.gov.inया संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीनेही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.तरी सर्व मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर वेळेत भरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support