Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

मुंबईच्या विकास आराखड्यावर 13.59 कोटींचा खर्च

 विशेष कार्य अधिकार्‍याला 46.55 लाख वेतन
मुंबईच्या विकास आराखड्यावर 13.59 कोटींचा खर्च

 ठाणे । प्रतिनिधी
प्रतिक्षित मुंबईचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत 13.59 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारीखाली मागवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. आराखडा समितीवर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर 46.55 लाख खर्च व सूचना व हरकती सुनावणीसाठी आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या तीन सेवानिवृत्त अधिकार्‍यांच्या मानधन व सुविधांवर 20 लाख खर्च करण्यात आले आहे. 
एमबी ग्राफिक्स आणि प्रिंटमोअर या कंपनीला 96 लाख, मेसर्स एडीसीसीला 1 कोटी 13 लाख, वीके पाठक सल्लागार व इन्फॉरमल समितीच्या सदस्यांना 7 लाख 90 हजार व मे. विदर्भ इन्फोटेकला 2015 मध्ये स्वीकारलेल्या सूचना व हरकतीच्या अनुषंगाने डेटा एंट्री कामासाठी 16 लाख अदा केले आहे. सुधारित मुंबईचा प्रारूप विकास आराखडा 2015 मध्ये एकूण 1.91 कोटी खर्च केले गेले आहेत.
 विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा यांच्या मे 2015 पासून मे 2016 या कालावधीत वेतनावर 16.55 लाख खर्च झाले आहे आणि त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या संगणकावर 46 हजार खर्च केले आहे. कंसल्टेट फॉर डीसीआर टीमचे कांजलकर यांस 3 लाख 70 हजार आणि इंफॉर्मल समितीच्या सदस्यांना 2 लाख दिले आहे. मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे उपलब्ध केलेल्या विविध प्रकारच्या मनुष्यबळासाठी 3 कोटी 35 लाख 55 हजार अदा केले आहे. बैटरी बैकअपसाठी मेसर्स एनएम सिस्टमला 29 हजार अदा केले आहे.
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे यांच्या कारकिर्दीत तयार केलेला मुंबईचा प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केला होता. फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित केलेल्या मुंबईचा प्रारूप विकास आराखडयावर 5 कोटी 60 लाख पाच हजार खर्च करण्यात आले आहेत. ज्यात 25 फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित आराखड्याच्या कामासाठी नेमलेले सल्लागार मे. इजिस जियोप्लानला 3.42 कोटी अदा केले आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support