Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

16 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत मंजूर

आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने दिलासा 
16 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत मंजूर

  पुणे । प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा देणारे अनेक निर्णय जिल्हा परिषदेकडून घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील 116 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्याबरोबरच वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने विविध निर्णय झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सहविचार सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्यासह वेतन पथकाचे अधिकारी उपस्थित होते. या सभेला शिक्षक परिषद व अन्य शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
अंशकालीन निवृत्तीवेतन योजनेतील 1 हजार 823 शिक्षकांच्या स्लिपांचे वाटपही केले जाणार आहे. संस्थेतील वादामुळे बढती रखडलेल्या शिक्षकांबाबत सरकारी नियमानुसार आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल. तसेच निवृत्त व 55 वर्षांवरील शिक्षकांनी एमएससीआईटी प्रशिक्षण न केल्याने होणारी वसुली थांबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुल्यांकन पात्र शाळांचे प्रस्ताव लगेचच उपसंचालकांकडे पाठवावे, 30 जूनपूर्वी 2016 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी द्याव्यात, अल्पसंख्याक शाळातील अनुकंपा नियुक्तीला मान्यता, 13 शाळांचे दर्जावाढ करण्याबाबत प्रस्ताव त्वरीत उपसंचालकांकडे पाठविणे, मूल्यांकनास पात्र शाळांचे प्रस्ताव लगेचच सरकारकडे पाठविणार आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
रायगडमधील शिक्षकांना दुय्यम सेवा पुस्तिका
रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना दुय्यम सेवापुस्तिका देण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षणाधिकार्‍यांकडून मुख्याध्यापकांना पत्र पाठविले जाणार आहे. त्यानंतर शिक्षकांना दुय्यम सेवा पुस्तिका उपलब्ध होतील. काही वेळा सेवापुस्तिका गहाळ झाल्यामुळे शिक्षकांची अडचण होत होती. मात्र, आता शिक्षकांकडे दुय्यम प्रत राहणार आहे.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support