Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 23, 2018

नाशिकची प्रियंका गोसावी ठरली मिसेस रायगड 2018

पेण । प्रतिनिधी
स्वररंग आयोजित पेण फेस्टिवलमध्ये झालेल्या मिसेस रायगड स्पर्धेत नाशिकच्या प्रियंका गोसावी यांनी मिसेस रायगड 2018 चे विजेतेपद पटकाविले. तर रोह्याच्या स्विटी चव्हाण यांनी द्वितीय क्रमांक आणि सपना पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धेत बेस्ट कॉस्ट्युम प्राची पाटील, बेस्ट स्माईल नताशा वैती, बेस्ट फोटोजनिक रसिका पाटील, बेस्ट पर्सनालिटी सई पवार, बेस्ट हेअर भाग्यश्री मोरे, बेस्ट कॅटवॉक वैद्यश्री पाठक आदी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेन्द्र साळवी, युवा नेते वैकुंठ पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, अनिकेत साळवी, मृगज कुंभार, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, चेतन मोकल, अक्षता साळवी, अनुप जाधव, पंकज म्हात्रे, नेहा कुंभार, स्नेहल सावंत, कविता झमसे, कोरिओग्राफर रूपेश चव्हाण, शैलेश साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. 
पेण नगरपरिषदेच्या मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेल्या मिसेस रायगड स्पर्धेत पेण, पनवेल, मुंबई, रोहा, नाशिक,  खोपोली, कामोठे, अलिबाग, लोणावळा, पुणे, महाड, उरण अशा विविध भागातील एकूण 24 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. साडी राउंड, ट्रेडीशन-इंट्रोड्यूस राउंड, प्रश्नोत्तर राउंड अशा तीन प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी आपल्या अदांचे उत्तम प्रदर्शन केले. तर झी मराठी हास्यसम्राट फेम निवेदक परेश दाभोलकर यांच्या उत्कृष्ट समालोचनाची साथ या स्पर्धेला लाभली. 
या स्पर्धेचे परिक्षण स्नेहल सावंत, कविता झमसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कौस्तुभ भिडे यांनी केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support