Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

महापौर चषकासाठी 44 कबड्डी संघात चुरस


महापौर चषकासाठी 44 कबड्डी संघात चुरस

मुंबई । प्रतिनिधी 
मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रोत्साहनामुळे सुरु होणारी पहिली महापौर चषक शालेय कबड्डी स्पर्धा जिंकण्यासाठी शालेय 44 संघामध्ये 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंतनगर-घाटकोपर मनपा शाळेच्या मैदानावर चुरशीचे सामने होतील. आत्माराम मोरे प्रतिष्ठान, निर्मल शिक्षण संस्थेचे विद्या निकेतन कॉलेज-घाटकोपर, स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मनपा-शारीरिक शिक्षण विभाग व आरएमएमएस सहकार्याने होणार्‍या शालेय कबड्डी स्पर्धेनिमित्त आयोजकांनी विविध शाळांमध्ये तज्ञ कबड्डी प्रशिक्षकांमार्फत पाच मार्गदर्शन शिबीर आयोजित करून शालेय मुलांमध्ये कबड्डीचा जोश निर्माण केला आहे.
पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्या शालेय संघांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित 11 व 12 डिसेंबर रोजी श्रमिक जिमखान्यात होणार्‍या मुंबई शालेय सुपर लीगमध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. परिणामी हशू अडवाणी मेमोरिअल स्कूल-गोवंडी, गौरीदत्त मित्तल विद्यालय-सायन, वरळी मनपा स्कूल, सेंट मेरी हायस्कूल-माझगाव, टिळकनगर माध्यमिक स्कूल, प्रबोधन कुर्ला माध्यमिक स्कूल, डॉ.अँटोनियो डासिल्वा हायस्कूल-दादर, समता विद्यामंदिर-कांदिवली, शारदाश्रम विद्यामंदिर-दादर, सायली इंटरनॅशनल स्कूल-बोरीवली, ना.म.जोशी मार्ग मनपा स्कूल, एस.जी.बर्वे मनपा स्कूल-चुनाभट्टी, माणिकलाल मेहता मनपा स्कूल-घाटकोपर, महाराष्ट्र हायस्कूल-लोअर परेल, स्टेशन चेंबूर मनपा स्कूल, उत्कर्ष विद्यामंदिर-मालाड आदी संघ पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत खेळणार आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support