Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

पुलगाव लष्करी तळावरील भीषण स्फोटात 6 जण ठार

नारायण शामराव पचारे (55 सोनेगाव), विलास लक्ष्मण पचारे (40, सोनेगाव), उदय  विरसिंग(तंत्रज्ञ), (37, जबलपूर), प्रविण प्रकाश मुंजेवार (25, केळापूर), राजकुमार भोवाने(23, केळापूर), प्रभाकर रामदास वानखेडे, विलास लक्ष्मण पचारे आणि नारायण शामराव पचारे अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये इसराईल मोहम्मद शहा, मनोज रामदास सयाम, प्रशांत हरिभाऊ माधावी, रुपराव सिताराम नैताम, संदिप शंकरराव पचारे, विकास शेषराव बेलसरे, दिलीप नीमगाडे, प्रशांत मुंजेवार, प्रवीण श्रीरामे, मनोज मोरे आदींचा समावेश आहे.
वर्धा । प्रतिनिधी
येथील पुलगाव परिसरातील लष्करी तळावर भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे.  तर 11 जण जखमी झाले आहेत. 
देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. 
मध्यप्रदेशातील  जबलपूर खामरिया ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील कर्मचारी जुने आणि वापरात नसलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी पुलवामा येथे आले होते. निकामी झालेले बॉम्ब नष्ट करण्याचे काम मंगळवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान करण्यात येत होते. तर ही घटना सकाळी 7.10 च्या दरम्यान घडली. स्फोटके निकामी करणारे काही कर्मचारी प्रशिक्षित होते, तर काही कंत्राटी कामगार होते, अशी माहिती संरक्षण खात्याचे  प्रवक्ते बी. बी. पांडे यांनी दिली. या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या शस्त्रभांडाराचा परिसर सुमारे 28 किमीचा आहे. या घटनेतील जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले असून घटनेचा तपास सुरू केला आहे. हे काम कंत्राटदार शंकर चांडक नामक व्यक्तीला दिले 
आहे.यातील दुर्घटनेतील जखमींवर सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, स्फोटके निकामी करण्याचे काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी माहिती आहे.  
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support