Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे काँग्रेसमध्ये

ठाणे भाजपातील गटबाजीचा आणखी एक बळी
माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे काँग्रेसमध्ये,

 मुंबई । प्रतिनिधी
ठाणे आणि मुंबईतील संघटीत गुन्हेगारीचे एकेकाळी कंबरडे मोडणारे माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराचा निषेध करून भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
निवृत्त झाल्यानंतर रविंद्र आंग्रे यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले होते. मात्र आंग्रे यांच्यासारखी गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेली व्यक्ती आपल्यासोबत असावी यासाठी प्रमुख राजकीय पक्ष त्यांच्या संपर्कात होते. ठाणेकर असलेले आंग्रे प्रारंभी शिवसेनेच्या निकट होते. मात्र ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचा केवळ उपयोग करून घेत दूर सारल्यावर नाराज झालेल्या आंग्रे यांनी समर्थ भारत संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांचा वसा घेतला होता. याच काळात राजकीय पक्षांकडून आग्रह वाढल्यामुळे आंग्रे यांनी कुठला राजकीय पक्ष निवडावा यासाठी काहीजणांशी सल्लामसलतही केली होती.
अखेर रावसाहेब दानवे यांच्याशी असलेले चांगले संबंध आणि ठाणे भाजपामध्ये योग्य सन्मानाचे आश्वासन मिळाल्यावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. भाजपात आंग्रे दाखल झाल्यावर बंदुकीचा निशाणा धरलेल्या आंग्रे यांचे बॅनर लावून ठाणे भाजपाने शिवसेनेला अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. ठाणे येथे गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकात कार्यरत असताना ठाणे जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारीचा एकहाती बिमोड करणार्‍या आंग्रे यांची लोकप्रियता वाढू लागल्यावर ते अनेकांना सलू लागले होते. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावणार्‍या आंग्रे यांना राजकीय वादंगात अडकवून त्यांचा काटा काढण्याचेही प्रयत्न झाले. भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेला ठाण्यात हम करे सो कायदा चालणार नाही, आता आमच्याकडे आंग्रे आहेत, असा इशारा दिला होता. मात्र, भाजपातही योग्य संधी मिळत नसल्यामुळे आंग्रे अस्वस्थ होते. ठाणे भाजपामधील गटबाजीमुळेही त्यांना विरोध सुरू होता. त्यांचे चिरंजीव हृषिकेश आंग्रे यांना ठाणे भाजयुमोचे पद देण्यात आले होते. पण नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये हृषिकेश यांना पदमुक्त करण्यात आले. आणि नाराज आंग्रे यांनी काँग्रेसची वाट धरली आहे.
 मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा करून सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळेच आपण भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे आंग्रे म्हणत असले तरी ठाणे भाजपातील गटबाजीच्या राजकारणाचेच ते बळी ठरले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. विविध पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणा-यांचा ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे राजकीय वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत हे स्पष्ट होते असे खा. अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support