Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

शिवसेना-भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा

ठाण्यात मनसेचे वादळ धडकले!
शिवसेना-भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा

 ठाणे । प्रतिनिधी
विकासाचे गाजर दाखवणार्‍या भाजपा-शिवसेना सरकारविरोधात एल्गार पुकारणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील पदाधिकार्‍यांनी सोमवारी विराट शक्तिप्रदर्शन घडवले. सेना-भाजपा सरकारच्या 4 वर्षांच्या कामगिरीचा पंचनामा करताना कुठे गेले अच्छे दिन? म्हणत ठाण्यातील मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अतिविराट मोर्चा काढला. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला  असा सुमारे 10 हजारांचा समुदाय या मोर्च्यात सहभागी झाला होता. महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राजू पाटील आदी पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

भाजप -शिवसेना सरकारविरोधात घोषणाबाजी करताना टोलबंदी, शेतकर्‍यांकडून जमीन अधिग्रहण करून खाजगी कंपन्यांचा विकास, कल्याण-डोंबिवलीच्या 27 गावांना महापालिकेने दिलेले खोटे आश्वासन, 65 कोटींच्या पॅकेचे गाजर, दिवा क्षेपणभूमी बंद करण्याचे आश्वासन, क्लस्टर योजनेतून फसवणूक, 30 वर्षांपासून रखडलेले कोपरी पुलाचे काम, भिवंडीतील वीजग्राहकांची लूट आणि स्मार्ट सिटीचे वास्तव आदी प्रश्नांवर  शिवसेना-भाजपाच्या कारभाराची चीरफाड मनसेकडून करण्यात आली. महागाई, शेतकरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरही मनसेने महामोर्च्यातून आवाज उठवला. मनसेकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या महामोर्चाची सुरुवात तीन हात नाका येथून दुपारी एक वाजता झाली. हा मोर्चा हरिनिवास सर्कलमार्गे, चिंतामणी चौक येथून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर येऊ न धडकला. त्यानंतर मोर्चाची सांगता अतिविराट सभेच्या रूपात झाली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support