Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

अगं सगळं करून झालंय आमचं!

अगं सगळं करून झालंय आमचं!

अगं सगळं करून झालेय आमचं. आठवतंय मला, मी बाविशीत असताना ऑफिसमधल्या सर्व सिनियर लेडीजची धावपळ पाहताना, वाटायचे कसे उठतात ह्या एवढ्या पहाटे मी तर मस्त राहते साखर झोपेत. तेव्हा चाळीशीत असणार्‍या गीता मॅडम आणि कांचन मॅडम म्हणायच्या अगं तुझे दिवस आहेत झोपायचे कशाला घेतेस टेन्शन आत्ताच लवकर उठायचे. एक दिवस असा येईल,  वाटेल तुला झोपावेसे आणि साधे पडायलाही मिळणार नाही, झोपून घे आत्ताच म्हणजे नंतर वाईट वाटणार नाही. 
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालेय आमचं. आठवतंय मला, मी पंचविशीत असताना, पदरी काही महिन्याची पहिली मुलगी असताना ऑफिसला जाताना होणारी माझी ती धावपळ सकाळ सकाळ सर्वांसाठी पोळी भाजी करून नवर्‍याचा आणि स्वतःचा टिफिन भरून ट्रेनसाठी धावताना. आणि दुसर्‍या बाजूला सुंदर अशा चाळीशीत असणार्‍या सुलोचना मॅडमला सुंदर साडी नेसून आलेल्या पाहताना वाटायचे आम्हाला वेळ नाही आरशातही पाहायला आणि मॅडम किती छान छान मॅचिंग करून आलेल्या. मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालेय आमचं.
आठवतंय मला, मी अट्ठाविशीत असताना, सगळ्या जबाबदार्‍या पेलताना होणारी ती चीड चीड की मी च का? असं विचार करत असताना, आणि दुसर्‍या बाजूला सुंदर अशा चाळीशीत असणार्‍या प्रज्ञा मॅडम आणि त्यांच्या वयाने जरा मोठ्या असणार्‍या मैत्रिणी सुधा आणि सुरेखा मॅडम शांतपणे माझ्याकडे पाहून हसणार्‍या मी म्हणायची तुम्ही इतके शांत कसे बसू शकता मी नाही सहन करू शकत, त्या म्हणायच्या अगं तू अजून लहान आहेस आमच्या एवढी झालीस की तू सुद्धा शांत होशील. मी म्हणायचे मी नाही शांत होणार, माझी चीड चीड खरी आहे, उगाचच सहन का करत राहायचे, गप्प का बसायचे. मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालेय आमचं..
आठवतंय मला, मी तिशीत असताना जेवणाच्या डब्याबरोबर आता मुलीच्या स्कूलचीही जबादारी वाढली होती. प्ले ग्रुपला जाताना तिची अंघोळ पांघोळ घालून स्कूल बसच्या मागे धावताना होणारी ती माझी धावपळ. आणि दुसर्‍या बाजूला 45 मध्ये असणार्‍या हेमा, रजनी आणि सुरेखा मॅडमची छान साडी बघून
आणि डब्याला काही स्पेशल बनवून आणताना, मला वाटायचे तुम्हाला काय तुमची मुले जातात कॉलेजला, मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या 
अगं सगळं करून झालेय आमचं..
आठवतंय मला, मी तेहतीशीत असताना, पदरी अजून एक लहान मूल असताना, रात्रभर तिच्यासाठी जागूनही पुन्हा सकाळी लवकर उठून जेवणाची तयारी करून मोठ्या मुलीचे सगळे आवरून आरशातही न पाहता मग स्वतःची तयारी करून ट्रेनसाठी धावताना होणारी ती माझी धावपळ आणि दुसर्‍या बाजूला सुंदर अशा 45 शीत असणार्‍या सायली मॅडमला सुंदर सुंदर कॉटनचे एक्सपेन्सिव्ह ड्रेस घातलेले पाहताना आणि भावना मॅडमला मॅचिंग टिकली आणि मॅचिंग लिपस्टिक लावताना आणि सुंदर सुंदर कानातले गळ्यातले घालून आलेले पाहताना 
वाटायचे आम्हाला आरशात ही पाहायला वेळ नाही आणि मॅडम किती आणि कसे छान छान मॅचिंग करून आलेल्या मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या म्हणायच्या अगं सगळं करून झालेय आमचं.
आठवतंय मला, मी पस्तिशीत असताना दोन लहान मुली, त्यांची शाळा आणि ऑफिसचा डब्बा एक एक जबादारी कमी नाही. पण वाढतच चालली होती, आणि धावपळ काही थांबत नव्हती आणि दुसर्‍या बाजूला सुंदर अशा पन्नाशीत असणार्‍या स्वाती मॅडमला सारखी सारखी लिपस्टिक लावताना आणि सकाळ सकाळ जॉगिंग आणि योगा करून ऑफिसला टका टक आलेले पाहताना एवढेच नाही तर मिताली मॅडमच्या केसातला छानसा गजरा पाहताना, संध्या मॅडमच्या साडी आणि ब्लॉऊजची मस्त डिझाईन पाहतांना कौतुक करावेसे वाटायचे आणि मी म्हणायची कसे जमते तुम्हा सर्वांना सगळे काही करून स्वतः ला इतके सुंदर ठेवताना आणि चेहर्‍यावर कायम आनंद निर्माण करताना, हळूच वाटायचे बर्‍याचजणींकडे बाई आहे कामाला, इथे चपात्या लागतात आम्हाला लाटायला
मॅडम हळूच स्मित हास्य देऊन म्हणायच्या अगं सगळं करून झालेय आमचं.
जरी ऑफीसमध्ये या सर्व अधिकारी वर्गात असल्या तरी घरच्या जाबदार्‍यांना कधी कोणी मुकल्या नव्हत्या, मुलांची काळजी आणि त्यांचा अभ्यास हाही कोणाला चुकला नव्हता. जेवणाची जबादारी म्हणजे जणू स्त्री जन्माला पाचवीलाच पुजल्या होत्या, पण त्यातून आपली स्वतःची ही प्रगती करताना छाया आणि ऋचा मॅडम किती काय काय शिकवायच्या आणि हळूच महत्वाच्या टिप्स पण मला द्यायच्या. मी म्हणायचे कसे काय जमते तुम्हाला? मला तर घर आणि ऑफिस यापलीकडे आपले काही अस्तित्व आहे हेच समजत नाही. 
शशी मॅडम काय, कल्पना मॅडम काय आणि माझी सर्विस करणारी आई काय या सर्वांचे एकच वाक्य अगं सगळं करून झालेय आमचं. आता मी स्वतः चाळीशी क्रॉस केली आहे, माझ्या मुली हायस्कूलमध्ये गेल्या आहेत, घरात स्वयंपाक बनवायला बाई आहे. आता, मलाही थोडासा वेळ मिळतोय आरश्यात पाहायला आणि थोडी फार लिपस्टिक लावायला. ऑफिसमधल्या 25, 30 शीतल्या मुली हळूच मला विचारतात किती छान मेन्टेन करता मॅडम तुम्ही कसे जमते तुम्हाला. तिशीत असणार्‍या हर्षूची होणारी ती धावपळ, मुलीसाठी होणारी तिची ती तगमग आणि मग तीही हळूच विचारते मला काय मॅडम तुम्ही खूप धन्य आहात. सगळे काही जिथल्या तिथे कसे जमते तुम्हाला! मग, आता मी पण हळूच स्मित हास्य देऊन म्हणते अगं सगळं करून झालेय आमचं. पण यावर मी थांबत नाही, मी सांगते हर्षुला. तू नको चाळीशीची वाट पाहूस आत्ताच ठेव एक बाई सकाळच्या मदतीला आणि शिकून घे काम विभागून करायला. कर्तव्याला कधी मागे हटू नकोस आणि स्वतःहून जबादारी घ्यायला कधी घाबरू नकोस, सगळ्या गोष्टीतून सामोरे जायला निसर्गानेच शक्ती दिली आहे स्त्रीला.
केस काळे असताना आणि कोमल त्वचा असताना शिक आरशात पाहायला स्वतःला नाही तर काळे केस कधी पांढरे झाले, कळणारही नाही तुम्हाला 
तू तरी चाळीशी झाल्यावर म्हणू नकोस नव्या पिढीला की अगं सगळं करून झालेय आमचं. मी हेही सांगेन तुला की कुठेतरी सुरुवात केली पाहिजे बदलायला. कुठेतरी सुरुवात केली पाहिजे बदलायला, कुठेतरी सुरुवात केली पाहिजे बदलायला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support