Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

थकबाकी भरा अन, वर्षभर मोफत दळण दळा!

भिवंडी शेलार ग्रामपंचायतीची कर वसूलीसाठी अनोखी शक्कल 
थकबाकी भरा अन, वर्षभर मोफत दळण दळा!
सुरुवातीला गावात घरोघरी जावून कापडी पिशव्यांचे वाटप करून थकबाकी भरण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. विशेष म्हणजे हायटेक समजल्या जाणार्‍या शेलार ग्रामपंचायतमध्ये एकूण 33 कर्मचारी कार्यरत आहेत.

 भिवंडी । प्रतिनिधी
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन देत असलेल्या नागरी सुविधांचा ग्रामस्थ लाभ घेत असतात, मात्र ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण्यासाठी ग्रामस्थांनी दुर्लक्ष केल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला. यामुळे गावाच्या विकासकामात अडथळे निर्माण झाले होते. यावर मात करण्यासाठी सरपंचासह सर्वच सदस्यांनी ग्रामसभेत ठराव पारित करून थकबाकीदारांनी थकबाकी भरल्यास त्यांना वर्षभर दळण मोफत दळून दिले जाईल अशी अनोखी शक्कल लढवून दळणाची मोफत सुविधा शेलार ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. 
थकबाकीच्या अनोख्या वसुलीचा फंडा भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीने राबविला आहे. बहुदा महाराष्ट्रतील पहिलीच वसुलीसाठी अनोखा उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत आहे. या उपक्रमाला गावकर्‍यांनीही प्रतिसाद देत 10 दिवसांतच 13 लाखांच्यावर थकबाकी भरल्याची माहिती प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना युवा सरपंच संदीप पाटील यांनी दिली. शेलार ग्रामपंचायत भिवंडी शहरालगतच असल्याने हा परिसरात 40 हजारच्यावर लोकसंख्या असून मोठ्याप्रमाणावर चाळी, इमारती, बंगले तसेच विविध कारखाने, लूम, गोदामे आहेत. यामुळे शेलार ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करून नागरी सुविधा देत आहे. 
गावकर्‍यांनी गावाच्या विकासासाठी आपलाही हातभार लावला असून थकीत कर भरण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच गावात अद्यावत 2 बस थांबे, तलावाचे सुशोभीकरण, शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रकल्प, सिमेंट रस्ते, आरोग्य सुविधा मिळत असल्याने गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support