Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 23, 2018

भिवंडीत पोलिसाचा तरुणीवर बलात्कार

भिवंडीत पोलिसाचा तरुणीवर बलात्कार

 भिवंडी । प्रतिनिधी
खाकी वर्दीला बदनाम करून तिच्यावर असलेल्या सामान्य माणसाचा विश्वास उडविणारी धक्कादाय घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने काही महिन्यापूर्वी बलात्कार केला होता. हा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याचा तपास करणार्‍या रोहन कमलाकर गोंजारी (34 ) या पोलीस उपनिरीक्षकानेच पिडीत तरुणीवर तपासाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पीडितेने कोनगाव पोलीस ठाण्यात गोंजारीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीत तरुणी मुंबईतील कफ परेड भागात राहणारी आहे. तिची काकी भिवंडीतील गायत्रीनगर परिसरात राहते. मुंबईहून ती काकीच्या घरी सुट्टीच्या दिवशी भेटायला यायची. नेहमीप्रमाणे ऑगस्ट 2015 रोजी ती भिवंडीत आली होती.त्यावेळी तिच्या मोबाईलचा रिचार्ज संपल्याने ती त्याच परिसरात एका मोबाईलच्या दुकानात रिचार्ज करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिची ओळख सतीश नकलवार याच्याशी  झाली. त्याने तिच्यासोबत ओळख वाढून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फिरण्याचा बहाणा करत तिला एका लॉजवर नेले. मात्र प्रियकराचे लग्न झाले असून त्याला दोन मुल असल्याचे समजल्यावर तिने प्रेमसंबंधास नकार दिला. त्यानंतरही त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. ही तरुणी दीड महिन्याची गरोदर राहिल्याने तिने सतीशला याची माहिती दिली. त्यावर त्याने पुन्हा प्रेमाचे नाटक करून तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या होत्या. 2015 ते जून 2018 पर्यंत वांरवार होणार्‍या अत्याचारामुळे आणखी दोन वेळा प्रियकराने तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भपात करायला लावले. दरम्यानच्या काळात सतीशची पहिली प्रेयसी राबिया खान हिला दोघांच्या प्रेमसंबधाची कुणकुण लागल्याने तिने पिडीत तरुणीला फोन करून आपले व सतीशचे प्रेमसंबध आधीपासून आहेत. यामुळे तू त्याचा पिच्छा सोड, असे सांगत तिच्याशी वाद घातला होता. त्यानंतरही पिडीत तरुणी आपल्या प्रियकरासोबत शरीरसंबध ठेवत असल्याचे तिला समजले. यामुळे पिडीतेला चहा पिण्याच्या बहाण्याने ती तिच्या घरी बुरखा घालून घेवून गेली. घरी गेल्यावर तिने पिडीतेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर सलीम नामक व्यक्तीकरवी बलात्कार करायला लावले. इतकेच नाहीतर राबियाने मोबाईलमध्ये या बलात्काराचे चित्रीकरण करून व्हिडीओही तयार केला होता. दुसर्‍या दिवशी राबियाने हा व्हिडीओ पिडीत तरुणीला दाखवला. त्यावेळी तिला धक्काच बसला.त्यावेळी पिडीतेला ब्लॅकमेल करून रबियाने तिच्याकडे 50 हजार रुपयाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. यामुळे पिडीतेने तिला 43 हजार रुपये दिले. तरीही तिला ती धमकी देत होती. आपली समाजात बदनामी होईल या भीतीने खडवली नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न तिने केला होता. मात्र एका मैत्रीणमुळे तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून कुलाबा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकार्‍याशी संपर्क साधून घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावर कुलाबा पोलिसांनी गुन्हा भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पिडीत तरुणीला महिला पोलीस कर्मचार्‍यासोबत घेवून शांतीनगर पोलीस ठाणे गाठून बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तिघाही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र पूर्वीच्या अत्याचाराच्या घटनाक्रमाला खुद्द पिडीत तरुणीने कलाटणी दिली. तिच्या माहितीनुसार सतीश माझा प्रियकर असून आमच्या दोघांच्या समंतीने आमचे शारीरिक संबध झाले आहेत.यामुळे प्रियकर सतीशवरील अत्याचारा गुन्हा मागे घेण्यासाठी तिने पोलिसाकडे तगादा लावला होता. मात्र या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना त्यावेळी शांतीनगर पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गोंजारी याने 16 ऑगस्ट 2018 रोजी रात्रीच्या 9 च्या सुमाराला पिडीत तरुणीला रांजणोली बायपास नाक्यावर बोलवले. त्यानंतर मोटार सायकलवर बसवून कल्याण रेल्वे स्टेशनसमोरील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गोंजारी याने पिडीत तरुणीकडून एका कागदावर लिहून घेतले होते कि माझ्या सहखुशीने मी पोलीस उपनिरीक्षक गोंजारी यांच्या सोबत शारीरिक संबध ठेवत आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support